शिक्षकांची जबाबदारी

0
263

गुरु’ पदाला सार्थ करणारी व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांच    – संतोष कुलकर्णी

उदगीर (दि 22) लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात शालेय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संतोष कुलकर्णी यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.या सत्कार प्रसंगी बोलताना संतोष कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृतीत शिक्षकांना अनन्यसाधारण महत्त्व असून संस्कारशील समाज निर्माण करण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातूनच घडत असतं. कोणतेही विद्यालय हे संस्थाचालकांमूळे नाही तर शिक्षकांमूळे नावारूपाला येत असते.पुढील काळात संस्थेच्या नावारूपासाठी शिक्षकांना सर्वोतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही संतोष कुलकर्णी यांनी दिली.

याप्रसंगी अध्यक्षस्थानी मधूकरराव वट्टमवार उपस्थित होते.मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन व आभार अनिता यलमटे यांनी मानले.यावेळी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक अंबूताई दीक्षित,लालासाहेब गुळभिले व सर्वच शिक्षकांची उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here