महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिनव मानवंदना….
उदगीर (6डिसें) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लालबहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सलग पाच तासाच्या ‘मूक वाचन साधना’ उपक्रमाचे आयोजन करून महामानवाला अभूतपूर्व अभिवादन करण्यात आले.या उपक्रमात 100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध पुस्तकांचे वाचन केले.या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बाबूराव आडे तर प्रमुख अतिथीस्थानी उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड ,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,लालासाहेब गुळभिले,माधव मठावाले,शिल्पा इंगळे ,कु.सायली सावळे उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कु.ऐश्वर्या कांबळे , कु.प्रणाली कांबळे , आनंदवर्धन सूर्यवंशी ,यशवंत गायकवाड या विद्यार्थ्यांनी भीमगीत गायले. प्रास्ताविकातून कु.जान्हवी पेद्दावाड हिने आंबेडकरांच्या अफाट ज्ञानसंग्रहाची व वाचनाच्या व्यासंगाची माहिती देत अभ्यासिकेच्या आयोजनाचे प्रयोजन स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी शिल्पा इंगळे मार्गदर्शनात म्हणाल्या,” डॉ.आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय व्यक्ति म्हणून जगण्यापेक्षा व्यक्तिमत्व म्हणून जगा असे ते म्हणत.” कु.सायली सावळे हिने आंबेडकरांचे संविधान निर्मितीतील योगदानाची माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक बाबूराव आडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, राजनैतिक, न्याय, साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रातील योगदानाविषयी माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली तसेच ‘मूक वाचन साधना’ या उपक्रमातील सहभागी वाचक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अक्षरा चिल्लरगे व आशा मोरे तर पाहूण्यांचा परिचय कु. निष्ठा भांगे व कार्यक्रम प्रमुख निता मोरे यांनी करून दिला.कार्यक्रमाचे आभार कु.सान्वी बिरादार व मयूरी शेरे यांनी मानले तर शांती मंत्र समिक्षा सकनूरे व सान्वी बिरादार हिने गायले.आनंदवर्धन सूर्यवंशी,यशवंत गायकवाड, ओंकार उल्लेवाड ,अपेक्षा केंद्रे या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची वेशभूषा साकारली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख आशाताई कल्पे, अनिता मूळखेडे,बालाजी पडलवार,विनायक इंगळे,गुरूदत्त महामुनी,गंगाधर यलमटे व सर्वच शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.