18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय*शासकीय योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविणार - आमदार अभिमन्यू पवार यांचे प्रतिपादन*

*शासकीय योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचविणार – आमदार अभिमन्यू पवार यांचे प्रतिपादन*

▪️ ९ वर्षे सेवा सुशासन मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाचे उदघाटन

▪️ शासन आपल्या दारी लाभार्थी घरोघरी मोहिमेचा शुभारंभ

लातूर, दि.22 ( प्रतिनिधी ) : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत सर्वेक्षण करून पोहचविणारे,असे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा येथे आयोजित केलेल्या ‘केंद्र शासनाच्या मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन ‘व ‘शासन आपल्या दारी- लाभार्थी घरोघरी ‘ योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केले.

केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रिय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन लातूर आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातुन ९ वर्षे सेवा सुशासन गरीब कल्यानाची मल्टिमीडिया चित्रप्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी आमदार श्री पवार बोलत होते.

यावेळी व्यासीठावर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, निलंगाचे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, पोलिस उपअधिक्षक रामदास इंगवले, औशाचे तहसिलदार भरत सुर्यवंशी,निलंगा येथील तहसिलदार श्रीमती उषाकिरण श्रुंगारे, गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि तहसिल प्रशासनाच्या
माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्यांच्या
दारापर्यंत जाऊन शासकिय योजनांचा लाभ पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार श्री पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची प्रगती जलदगतीने होत आहे. एकेकाळी जागतिक अर्थव्यवस्थामध्ये १० वा क्रमांक असणारा भारत आज अर्थव्यवस्थेमध्ये ३ ऱ्या क्रमांकावर आहे. केंद्र शासनाच्या उज्ज्वला गॅस योजना, मुद्रा योजना, स्टार्ट अप इंडिया, स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाव बेटी पढाव सारख्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल म्हणाले, केंद्रीय शासकिय योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत नाही परंतु आज याठिकाणी केंद्रिय संचार ब्यूरो यांनी आयोजित केलेल्या मल्टिमीडिया प्रदर्शनात अनेक योजनांची माहिती दिली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री चव्हाण यांनी प्रास्ताविकेत म्हणाले, केंद्र शासनाने मागील ९ वर्षात अनेक कल्याणकारी योजना, उपक्रम, निर्णय आणि विकास्तमक धोरणांची माहिती चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. यामध्ये पंतप्रधान घरकुल योजना, सुकन्या समृध्दी योजना, पी एम गतिशक्ती योजना, पंतप्रधान पीक विमा योजना यासारख्या विविध योजनांची माहिती दिली आहे. सदर प्रदर्शन हे उद्या सायंकाळी ६ वाजे पर्यंत लोकांना बघण्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे.

कार्यक्रमात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना, जिल्हा परिषदच्या सेस फंडातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश, प्रमाणपत्र आणि लॅपटॉप वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री ए कुंभार यांनी केले. चित्रप्रदर्शनामध्ये तहसिल कार्यालय, आरोग्य विभाग, जल संधारण विभाग, पंतप्रधान ग्रासडक विभाग, पंचायत समिती, नगर परिषद, बाल विकास प्रकल्प आणि पोलीस विभाग आदी विभागांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचे माहिती दालन ठेवण्यात आले आहे.

या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी सहायक प्रसिध्दी अधिकारी अंबादास यादव, अपर तहसिलदार नायब निलेश व्होनमोरे, तहसिलदार इंद्रजित गरड, कार्यालय सहायक जे एम हनूरे,साईराज राऊळ, सूरज जाधव आणि तहसिल कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]