27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसाहित्य''शब्दांकित साहित्य मंचचा हा उपक्रम साहित्यातील नवा पॅटर्न"

”शब्दांकित साहित्य मंचचा हा उपक्रम साहित्यातील नवा पॅटर्न”

– प्रसिद्ध लेखक, समिक्षक प्रा. डॉ. शंकर विभूते यांचे मत

शब्दाकिंत साहित्य मंच, लातूर द्वारा आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमाचे सर्व जिल्ह्यांनी अनुकरण केले पाहिजे, असे सांगून लातूर पॅटर्न शिक्षणासाठी प्रसिद्ध आहेच. आता साहित्यातील हा उपक्रम एक पॅटर्न निर्माण होत आहे. असे सांगून ‘पाच आ-याचं चाक’ या पुस्तकावर ठेवलेली चर्चा कौतुकास्पद असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक, समीक्षक  प्रा. शंकर विभूते यांनी मांडले आहे.

शब्दाकिंत साहित्य मंच, लातूर द्वारा आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ हा कार्यक्रम  असंख्य श्रोत्यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमा अंतर्गत जेष्ठ लेखक देविदास फुलारी यांच्या ‘पांच आ-याचं चाक या साहित्य कृतीवर लेखिका विद्या बयास- ठाकूर यांनी भाष्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक, समीक्षक प्रा. शंकर विभूते होते. तर प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ लेखक देविदास फुलारी यांची होती.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. नयन भादुले- राजमाने’ साहित्यनयन’ यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक, समीक्षक  प्रा. शंकर विभूते यांनी संमर्पक शब्दांत आपल्या विचारांची मांडणी केली. शब्दांकित साहित्य मंचच्या या उपक्रमाचे कौतुक करत ते म्हणाले की “शब्दांकित साहित्य मंचच्या या उपक्रमाचे सर्व जिल्ह्यांनी अनुकरण केले पाहिजे, ते ही त्यांच्या नावाचा उल्लेख करून. लातूरचे पॅटर्न प्रसिद्ध आहेतच. साहित्यातील हा एक पॅटर्न शब्दांकित साहित्य मंचने तयार केला आहे. ‘पाच आ-याचं चाक’ या पुस्तकावर विद्या बयास-ठाकूर यांनी विस्तृत विवेचन केले. त्याच बरोबर आपले परखड विचार व मत ही व्यक्त केले. त्या म्हणाल्या लेखकाची स्त्रीजीवनाबद्दलची कमालीची हळवी संवेदनशिलता, कणव, उदार सहिष्णुता यामुळे वाचकांच्या मनात लेखकाप्रती आदरभाव उत्पन्न होतो. द्रौपदीचा मनोव्यापार रेखाटताना तर ही संवेदनशिलता पराकोटीला पोहचली आहे. त्याशिवाय लेखकाने ज्या पद्धतीने महाभारतातील अतर्क्य घटनांचा अन्वयार्थ लावला आहे त्यावरून लेखकाचा वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, तर्कसंगत दृष्टीकोन स्पष्ट होतो. तर एकुणच कादंबरीभर लेखकाची चिकीत्सक वृत्ती प्रत्ययाला येते. महाभारतातील सर्वश्रूत घटनांची वस्तुनिष्ठ स्वरूपात केलेली पूनर्मांडणी हे या कादंबरीचं महत्वपुर्ण वैशिष्ट्य आहे. तसेच महाभारताच्या कथानकात समाविष्ट पात्रांचं मर्त्य मानवी पातळीवरून केलेलं रेखाटन या बाबी या कादंबरीचा आत्मा आहेत. कादंबरीचे मुखपृष्ठ आवडले नसल्याचे ही त्यांनी नम्रपणे नमूद केले. ज्येष्ठ लेखक देविदास फुलारी सरांनी वक्त्यांने मांडलेल्या विचारांना स्विकारत  शब्दांकित साहित्य मंचच्या उपक्रमाचे कौतुक केले, अनेक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमात मान्यवर जाणकार श्रोत्यांची उपस्थिती होती. प्रा. मारुती कसाब, प्रा. डॉ. प्रविण कांबळे, प्रा. डॉ. तानाजी भोसले, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, डॉ. नरसिंग वाघमोडे, डॉ.श्रीकांत मुद्दे, इंजि. सौरभ घेवारी, कलावती भातंब्रेकर, दिपक पवार, इंजि. आकांक्षा राजमाने- घेवारी,अनिता दाणे, इंजि.अपूर्वा राजमाने- कुबंरे, प्रा.अरुणा चौधरी, प्रा. डॉ.अाशा कांबळे, ,प्रा.डॉ.सुरेखा बनकर,  डॉ.संजय जमदाडे, प्रा. डॉ.द्वारका गीते,शीला कुलकर्णी, सुलक्षणा मुळे, सुलक्षणा सोनवणे, सुनीता मोरे, सुषमा बुचडे,राजेंद्र अत्रे, कविता पुदाले, डॉ.कुसुमताई मोरे, श्री.महेश राजमाने, बाबूराव घायल, हिराबाई गाडवे, प्रा. अनिता चौधरी, मा.नागेश बोईनवाड, डॉ.प्रभा वाडकर, संगीता केसकर,मा.उमा कोल्हे, मा. आशा पाटील,  सुरेश गीर ‘सागर’ संचिता खोत, प्रा.डॉ.गोविंद जाधव इ. अनेक रसिक श्रोत्यांची उपस्थिती होती. प्रसिद्ध लेखिका डॉ.छाया महाजन व कमलताई नलावडे यांची उपस्थिती आनंददायी व प्रेरणादायी होती. इ. रसिक जाणकार श्रोत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.या प्रसंगी मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र, कोकण इत्यादी विभागातून श्रोते उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ.क्रांती मोरे, प्रा. नयन राजमाने, विजयाताई भणगे, शैलजा कारंडे, उषा भोसले,प्रा.डॉ.मीना घुमे, विमल मुदाळे, वृषाली पाटील यांनी प्रयत्न केले. तंत्रसहाय्य आकांक्षा घेवारी व अपूर्वा कुबंरे यांनी केले. यांच्या सहकार्याने कार्यक्रम दीर्घ काळ स्मरणात राहू शकला. त्याबद्दल शब्दांकित मंचच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक आभार. सूत्रसंचालन शब्दांकित साहित्य मंचच्या सचिव शैलजा कारंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार शब्दाकिंत साहित्य मंचच्या कोषाध्यक्ष प्रा. डॉ. क्रांती मोरे यांनी मानले.

—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]