शनिवारी किल्लारीत स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा सत्संग सोहळा …
स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते ४० वा गळीत हंगाम शुभारंभ ..
औसा – औसा तालुक्यातील किल्लारी येथे (दि.२५) नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नानीजधाम चे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला असून या दरम्यान त्यांच्या हस्ते किल्लारी सहकारी साखर कारखान्याचा ४० वा गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाचवे पीठाधिपती नाथ संस्थान औसा हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे ,हभप दतात्रय पवार गुरुजी व किल्लारी चे सरपंच सौ.सुलक्षणा धनराज बाबळसुरे तसेच आमदार अभिमन्यू पवार ,आमदार ज्ञानराज चौगुले ,उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर ,उपनिबंधक सहकारी संस्था एस.आर .नाईकवाडे यांची उपस्थिती राहणार आहे.या कार्यक्रमासाठी सर्व सभासद ,ऊस उत्पादक आदीसह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संचालक आर .एस.बोरावके यांनी केले आहे.लातूर जिल्हयात तेरा ते चौदा वर्षांनंतर नानीजधाम चे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज येणार असल्याने या कार्यक्रमासाठी संपूर्ण मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात त्यांचे भक्तगणन याठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगाने आयोजक मंडळाने कार्यक्रमाची तयारी पुर्ण केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून बंद राहिलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने सुरू होत आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
१४ वर्षानंतर स्वामी नरेंद्राचार्य महाराज लातूर जिल्ह्य़ात ….
राज्यासह मराठवाड्यात स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.महाराजांच्या सत्संग सोहळ्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहात असल्याने किल्लारी येथील कार्यक्रमासाठी आवश्यक ती तयारी पुर्ण करण्यात आली आहे.याचबरोबर स्वामी नरेंद्राचार्य महाराज १४ वर्षानंतर जिल्हयात येणार असल्याने या कार्यक्रमासाठी पन्नास हजारावर अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.