दयानंद कला महाविद्यालयाची शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल
लातूर…दयानंद कला महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी कोव्हिड लसीकरणाचा पहिला डोस सामुहिकरीत्या दि. 07 एप्रील 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पानचिंचोली ता. निलंगा, जि.लातूर येथे घेतला होता. त्यानंतर वेळोवेळी महाविद्यालयाने कोव्हिड लसीकरणांदर्भात पाठपुरावा करून कोव्हिड लसीकरण करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करून भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न केला आहे. दि. 30 जुलै रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी. गायकवाड, सौ. जयमाला गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, सौ. क्रांती माळी, श्रीमती सुरवसे ए.ए., श्रीमती दहिरे एन. आर. श्रीमती आदमाने सी. एम., कु. सांडुर रोहिणी, श्री. यलमटे उमेश आदि प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दयानंद सभागृहाच्या लसीकरण केंद्रात सामुहिकरीत्या कोव्हिड लसीकरण करून घेतले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदयजी सामंत यांनी आज केलेल्या अवाहनानुसार महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शंभर टक्के कोव्हिड लसीकरण करण्याचा निर्धार दयानंद कला महाविद्यालयाने केला आहे. प्राध्यापक व पशासकीय कर्मचाऱ्यांनी कोव्हिड लसीकरण करून घेणे अनिवार्य आहे. अशी सूचना प्रशासनाच्या वतीने प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आलेली आहे. महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्था अध्यक्ष मा. लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष मा. अरविंदजी सोनवणे, मा.ललितभाई शहा, मा. रमेशकुमार राठी, सचिव मा. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव मा. सुरेशजी जैन, कोषाध्यक्ष मा. संजयजी बोरा यांनी कौतुक केले आहे.
————————————————————————–