व्यर्थ न हो बलिदान

0
510

 

१ ते १५ ऑगस्ट दरम्यान काँग्रेस पक्षाचे ‘व्यर्थ न हो बलिदान’अभियान

लातूर शहरात काढली क्रांतीज्योती यात्रा आणि तिरंगा पदयात्रा

लातूर प्रतिनिधी (सोमवार दि. ९ ऑगस्ट २१)   यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आपण आपल्या देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार असून त्यानिमित्ताने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर येण्यासाठी राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने १ ते १५ ऑगस्ट २१ दरम्यान ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून लातूर शहर जिल्हा काँग्रेस, जिल्हा सेवा दल तसेच शहर जिल्हा सेवादल यांच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरातून क्रांतीज्योत यात्रा तर ९ ऑगस्ट रोजी सकाळी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेस पक्षाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या अभियानातर्गत १ ते १५ ऑगस्ट दरम्यान लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करणे, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करणे आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा पुढचा भाग म्हणून लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी लातूर शहराच्या मुख्य बाजारपेठेतून क्रांती ज्योत यात्रा काढण्यात आली, गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या यात्रेचा समारोप करण्यात आला.

९ ऑगस्ट रोजी सकाळी शहर जिल्हा काँग्रेसच्या पुढाकारातून जिल्हा काँग्रेस सेवादल आणि शहर जिल्हा काँग्रेसच्या शिस्तबद्ध स्वयंसेवकांनी काँग्रेस भवन येथून भव्य तिरंगा पदयात्रा काढली. महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्या नंतर, हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. याठिकाणी शेवटी पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

या उपक्रमात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सोबतच शहरातील नागरीकही सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here