वेबिनार संपन्न

0
305

 

फार्मसीच्या विविध विषयावर दयानंद फार्मसीत

सहा दिवशीय वेबिनार सिरीज संपन्न

लातूर दि. २२.दयानंद शिक्षणसंस्था,लातूर द्वारा संचालित दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर नुकतेच जुलै २०२१ मध्ये सहा दिवशीय फार्मसी च्या विविध उपयुक्त व प्रभावी अशा विषयांवर वेबिनार सिरीज आयोजित केले होते. या वेबिनार सिरीज चे संयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.क्रांती सातपुते व वेबिनार समन्वयक डॉ.वाजिद चाऊस,प्रा. बिराजदार महेश , प्रा. मानके महेश यांनी आयोजित केले होते.

“इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स” या विषयावर कुमारस्वामी महाविद्यालय,औसा चे प्राचार्य डॉ. बेटकर एम.एम., “प्रेवेंटिंग सेक्सच्युअल हऱ्याशमेंट ऍट वर्कप्लेस” या विषयावर दयानंद विधी महाविद्यालय, लातूर च्या प्राचार्या डॉ.नत्थानी पी.पी. ओरिएन्टेशन ऑन इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्राम ” या विषयावर शोध ऍडव्हानटेक एल.एल.पी,औरंगाबाद चे प्रमुख संस्थापक मैत्रेय मुडकवी , ” इंटरेप्रेनरशिप अपॉर्च्युनिटीझ इन फार्मा सेक्टर ” या विषयावर युफोरिया लाईफ सायन्सेस एल.एल.पी, पुणे चे मार्केटिंग डायरेक्टर प्रा.राम पेंटेवार, ” ओव्हरव्हीयु ऑफ मॅनुफॅक्चरिंग ऑफ सॉलिड डोसेज फॉर्म -इंडस्ट्रियल आस्पेक्ट ” या विषयावर ओमान फार्मासुटिकल प्रॉडक्ट्स,ओमान चे असि.मॅनेजर येरोळे प्रसाद, ” पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्किल एन्हान्समेंट & माईंड ट्रेनिंग ” या विषयावर मुंबई चे सॉफ्टवेअर इंजिनियर अर्शद सय्यद आदी मान्यवर विषय तज्ञांनी आपापल्या विषयांवर अतिशय उपयुक्त आणि परिणामकारक अद्ययावृत्त अशी माहिती दिली.

औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) हे देशातील सर्वांत विकसित आणि आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि फार्मसी शाखा ही आरोग्य विज्ञानातील प्रमुख शाखांपैकी एक आहे. हे प्रगतीशील क्षेत्र ओळखले जाते त्याची उपयुक्तता कशी आहे याबाबत माहिती करून देण्यासाठी व विविध विषयातील अद्ययावत माहिती मिळावी म्हणून ही ऑनलाईन वेबिनार श्रुंखला महाविद्यालयातर्फे खास विद्यार्थी,फार्मसी क्षेत्रातील तज्ञ् यांच्या करिता आयोजिली होती आणि या ऑनलाईन वेबिनार मध्ये दररोज बी.फार्म,डी.फार्म च्या साधारणतः ४३८ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी यशस्वी सहभाग नोंदवून वेबिनार श्रुंखला यशस्वी केली.

या ऑनलाईन वेबिनार उपक्रमा बद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,उपाध्यक्ष अरविंदराव सोनवणे,ललितकुमार शहा,रमेश राठी,सचिव रमेश बियाणी,सहसचिव सुरेश जैन,कोषाध्यक्ष संजय बोरा यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here