लातूर: येथील जुन्यापिढीच्या शिक्षिका श्रीमती रोहिणी शशिकांत बोकील यांनी श्री गुरूजी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आरओ प्लाॅट व कोल्ड वाटर फिल्टर प्लॅंट श्री गुरूजी आयटीआय ला भेट दिला. प.पू.गोळवलकर गुरूजींच्या स्मृती दिना निमित्त या प्लॅंटचे लोकार्पण श्रीमती रोहिणी बोकील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.तसेच गौरी बोकील व अनुपमा पाटील यांच्या हस्ते प.पू. गोळवलकर गुरूजी स्मृतिदिन व जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करून श्री गुरूजींना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी संस्था अध्यक्ष अतुल ठोंबरे, संचालक गीता ठोंबरे,,मंगल ठोंबरे,निर्मला पाटील, सुनिल बोकील,विभा बोकील, रवि मार्कंडेय, रेखा मार्कंडेय, कृष्णा ठोंबरे,सौरभ कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास घोडके ,प्रविण फत्तेपूरकर,यांनी विशेष प्रयत्न केले.