उपमुख्यमंत्री यांची संघटनेशी सकारात्मक चर्चा
लातूर: महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी,अभियंता संघर्ष समितीच्या माध्यमातून वीज कर्मचाऱ्यांनी ७२ तासाच्या संप पुकारला होता.उपमुख्यमंत्री तथा उर्जामंञी फडणवीस यांनी संघटने समवेत केलेली चर्चा सकारात्मक झालेले आहे.त्या मुळे हा संप मागे घेण्यात आला.महावितरण,महापारेषण, महानिर्मिती कंपन्यांमधील
खाजगीकरण बंद करावे, या व अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती च्या वतीने महाराष्ट्रभर विजकर्मचाऱ्यांनी ७२ तासाचा संप पुकारलेला होता. याचाच एक भाग म्हणून लातूर महावितरणच्या परिमंडळ कार्यलयासमोर वीज कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी लातूर येथील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते व अधिकारी संघर्ष समितीच्यावतीने ७२ तासाचा संप वीज कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे. दरम्यान, या संपामध्ये विद्युत कर्मचारी, अभियंते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील रिक्त पदे भरावीत, इंप्लॅनमेंट पद्धतीने कंत्राटीकरण बंद करावे, महावितरणमधील २०१९ नंतरचे सर्व उपकेंद्रे कंपनीमार्फत चालवणे व त्या उपकेंद्रामध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करावी, जनतेच्या मालकीच्या जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण करू नये,आदी मागण्या यावेळी करत वीज कर्मचाऱ्यांनी लातूर परिमंडळाच्या कार्यालयासमोर मोठे आंदोलन उभे केले होते.या आंदोलनाला माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे,विश्वंभर भोसले.प्रताप भोसले.यांनी संपाला पांठीबा दिला.तर कामगार प्रतिनिधी अनिल पुरी ,राहुल भंडारे,राजकुमार कत्ते.प्रशांत जानराव,राजीव भुजबळे,सुदर्शन बोळेगावे,राजेद्र जाधव,सिध्दार्थ कुसभागे,गंगाधर भाडुळे,आदी कामगार प्रतिनिधीनी या वेळेस आंदोलनाला संबोधित केले.
अदानी कंपनीला मुंबई उपनगरात वीज वितरण चा समांतर परवाना मिळाला तर १७४० कोटी रुपये महसूल देणारा प्रभाग महावितरण च्या हातून जाईल. त्यामुळे शहरी भागाच्या उत्पन्नावर क्रोस सबसिडी च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकावर दरवाडीच्या माध्यमातून गंभीर परिणाम होणार आहे.जनतेचा मालकीचा वीज उद्योग खाजगी भांडवलंदाराच्या घशात जाईल. जनतेचा वीज उद्योग जनतेच्या मालकीचा राहावा या व अशा विविध मागण्यांसाठी वीज कर्मचारी ७२ तासाच्या संपावर गेले होते सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते,अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने पुकारलेला संप मागे घेण्यात आला.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित
वीजकर्मचारी यांनी पुकारलेल्या संपामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला
लातूर शहरातील पाच नंबर चौक एम आय डी सी परिसर , उदगीर शहरातील मोठा भाग , अहमदपूर शहर, रेणापूर, निलंगा परिसरातील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.