विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
भक्तीचा नसावा देखावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
परमार्थाचा नसावा कांगावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
सत्तेचा माज जरा उतरावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
नात्यांमध्ये रुजावा गोडवा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
भुकेल्यांना घास मिळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
नागड्यास कपडा मिळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
बेघरास निवारा मिळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
नीतिमत्तेस थारा मिळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
भक्तगणास न्याय लाभावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
निसर्गाचा तोल सांभाळावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
भेदाभेदास अंत असावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
विश्व विधात्या विठ्ठला
पामराने काय मागावे तुला?
माणूस माणसात राहावा
यात तेवढे लक्ष घाल बाबा
बाकी कळावे लोभ असावा…
रचना : दिनांक 10 जुलै 2022,
रात्रौ 12:15
कवयित्री,
डॉ. संगीता गोविंदराव आवचार,
उपप्राचार्य तथा इंग्रजी विभाग प्रमुख,
कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय,
परभणी – 431 401
महाराष्ट्र
परभणी जिल्हाध्यक्ष,
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ
चल भाष्य : 9767323290
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏
विश्व मांगल्याची भक्तिमय आस प्रतित करणारी
काव्यरचना लयता – गेयता आणि यमकरचना
ओजस्विपणे प्रतित करते.
अप्रतिम काव्यरचना मॅडम….!! 💐💐