विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये अत्याधुनिक डेंटल व मुख रिहॅबिटेशन विभागाचे उद्घाटन
लातूर (माध्यम वृत्तसेवा):- येथील विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नवीन डेंटल व मुख रिहॅबिटेशन विभागाचे उद्घाटन पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे काका यांच्या हस्ते विजयादशमी दिवशी करण्यात आले. या अत्याधुनिक सुविधेमुळे कॅन्सर रुग्णांची सोय होणार आहे.
विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये विशेषतः मुख कर्करोगग्रस्तांना मुखातील टाळू बसविणे,जबडा बसविणे, मुखकर्करोग शस्त्रक्रिया पश्चात तोंडाच्या जबड्याची हालचाल वाढविणे व इतर दंतोपचार उपलब्ध झाले आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ.अरुणा देवधर, प्रशासकीय अधिकारी डॉ. गौरी कुलकर्णी, कॅन्सर तज्ञ डॉ. ब्रिज मोहन झंवर,डॉ.प्रमोद टिके, डॉ,आरती झंवर,डॉ, सुशेन गाजरे, डॉ, पवन खिचडी, डॉ, निर्मला गाजरे व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.