राज्यात महाविकास आघाडीचे नव्हे
तर महावसूलीचे सरकार–आ. कराड
खरोळा जिल्हा परिषद गटातील पावनेदोन कोटीच्या कामाचा शुभारंभ
लातूर दि.२२- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागातील विकास कामासाठी दमडीचाही निधी दिलेला नाही या सरकारने विकास कामे करण्याऐवजी प्रत्येक क्षेत्रात केवळ वसूली करण्याचेच काम करीत असल्याने या महावसूली आघाडी सरकारला जनता वैतागली असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
रेणापूर तालुक्यातील खरोळा जिल्हा परिषद गटातील पावनेदोन कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण मंगळवारी आ. कराड यांच्या हस्ते विविध गावात झाला त्यानंतर गोविंदनगर येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच व्यंकटराव जाधव हे होते या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गोडभरले, भाजपा ओबीसी आघाडीचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, विधानसभा प्रमुख अनिल भिसे, तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, महेंद्र गोडभरले, जिल्हा उपाध्यक्ष वसंत करमुडे, सतिष अंबेकर, श्रीकृष्ण जाधव, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगांवकर, सरपंच रामभाऊ बडे, सरपंच परमेश्वर दंडे, रमाकांत फुलारी, प्रशांत डोंगरे, सिद्धेश्वर मामडगे, शिवाजी उपाडे, आबासाहेब चव्हाण, लालासाहेब जाधव, मदन दहिफळे, शालिक गोडभरले, अभिजित मद्दे यांच्यासह अनेक गावचे सरपंच, चेअरमन, भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
राज्यात भाजपा सरकारने सर्वांना न्याय देण्याचे काम केले तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सर्वसामान्यांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना सुरु केल्या त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहचत असल्याचे सांगून आ. कराड म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारने जलयुक्त यासह अनेक योजना बंद केल्या ग्रामीण भागातील विकास कामाला कसलाही निधी दिला नाही उलट सध्या जी काही कामे सुरु आहेत ती सर्व कामे केंद्र शासनाच्या विविध विभागामार्फत सुरु असल्याची माहिती दिली.
राज्यातील आघाडी सरकारच्या काळात प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरु असून मंत्री जेलमध्ये गेले काहीजणांची चौकशी सुरु आहे. हे सरकार किती दिवसाचे आहे हे सरकार मध्ये काम करणार्यांना सुद्धा माहीत नाही केंव्हाही कधीही सरकारला पायउतार होण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री असतानाही त्यांनी कोरोनाच्या काळात जिल्ह्याला आरोग्य सुविधा देवू शकले नाहीत ऑक्सीजन अभावी अनेकांचे जीव गेले औषधे, इंजेक्शनचा काळाबाजार करून मोठा भ्रष्टाचार केला.
मांजरा परिवाराच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकर्यांची अडवणूक आणि पिळवणूक केली जात आहे. अनेक गावागावात असंख्य शेतकर्यांचा ऊस उभा ठेवून बाहेरच्या ऊसाचे गाळप करण्याचे काम होत आहे. एफआरपी साठी आंदोलन वेळोवेळी मागणी केली मात्र अद्यापही शासनाच्या नियमानूसार शेतकर्यांना गाळप केलेल्या ऊसाचा भाव मिळाला नाही. शेतकर्यांची होणारी गळचेपी थांबविण्यासाठी लातूर-रेणापूर तालुक्यात लवकरच आदर्श साखर कारखाना उभा करीत आहोत अशीही माहिती यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदार संघात ५-६ कोटी रुपयांची कामे झाली असून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीत भाजपाला साथ द्यावी असेही अवाहन शेवटी आ. कराड यांनी केले.
खरोळा जि.प. गटातील जवळगा, रामवाडी, खरोळा, मोहगाव, चुकारवाडी, पाथरवाडी, गोविंदनगर येथील सिमेंट रस्ता, नाली बांधकाम, शाळा खोली बांधकाम, समाजमंदिर दुरुस्ती, एस.आर.एफ. रस्ता, आरोग्य केंद्र दुरुस्ती, विद्युतीकरण आदि कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते करण्यात आले. ठिकठिकाणच्या कार्यक्रमास निवृत्ती चिद्रे, रविंद्र पाटील, नारायण राठोड, जलील शेख, गोपीनाथ खताळ, रमेश गोडभरले, अनिल येलगटे, गणपत गोडभरले, शिवाजी कलूरे, प्रमोद कुटवाड, मंचक चामे, उमाकांत गोडभरले, शिवराज सप्ताळ, राहुल गोडभरले, नामदेव गोडभरले, राजकुमार मानमोडे, पांडुरंग राऊतराव, दिलीप कुलकर्णी, बाळु हेने, महेंद्र पिंपळे, रमेश मद्दे, संगमेश्वर तत्तापूरे, विलास दंडे, सुरेश बुड्डे, नंदू वल्लमपल्ले, दिलीप बरुरे, बालाजी बरुरे, भास्कर दहिफळे, रमेश बडे, रमाकांत बरुळे, खलील ताशेवाले, प्रेमानंद गोडभरले, पुंडलिक दिवटे यांच्यासह ठिकठिकाणी अनेकजण होते.