राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष
स्व.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची ९२ वी जयंती साजरी
निलंगा-
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची ९२ वी जयंती विविध सामाजिक, धार्मिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब जयंती उत्सव मंडळ व महाराष्ट्र शिक्षण समिती, निलंगा च्या वतीने सकाळपासून विविध कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी ८ वाजता निळकंठेश्वर मंदिरामध्ये अशोकराव पाटील निलंगेकर व संगिता पाटील निलंगेकर यांच्या हस्ते अभिषेक करुन निलंगेकर साहेबांना अभिवादन केले.
यानंतर शहरातील हजरत पिरपाशा दरगाह, हजरत दादापीर दरगाह येथे अशोकराव निलंगेकर यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली. शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तर धर्मवीर संभाजी चौकास पुष्पहार घालण्यात आला. तद्नंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तर उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. याचबरोबर निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित स्व. डॉ. निलंगेकर साहेबांना अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अनेक मान्यवरांनी निलंगेकर साहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सिंदखेड येथे असलेल्या दादाबाग या समाधीस्थळावर हजारो लोकांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले तसेच अशोक बंगला येथे भाऊगर्दी केली. यावेळी शहरातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाधीस्थळी जाऊन अभिवादन केली.
महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा अंतर्गत महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात आले. तर महाराष्ट्र महाविद्यालय येथे निलंगेकर साहेबांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवजागृती महाविद्यालय, नळेगाव येथील प्राचार्य डॉ. संजय वाघमारे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ हे होते.
यावेळी महाराष्ट्र भाजपचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय सोळुंके, जिल्हा दुध महासंघाचे चेअरमन प्रा. राजेंद्र सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष सुनिताताई चोपणे, पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे, राष्ट्रवादीचे पंडितराव धुमाळ, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, निलंगा शहर काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद शिंगाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष इस्माइल लद्दाफ, युवा सेना अध्यक्ष प्रशांत वांजरवाडे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख विनोद आर्य, माजी पाणीपुरवठा सभापती इश्वर पाटील, लाला पटेल, सुरेंद्र धुमाळ, रमेश मोगरगे, नारायणराव सोमवंशी, अशोकप्पा शेटकार, शिरुर अनंतपाळचे लक्ष्मण बोधले, शिरुर अनंतपाळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बाचके, रोहन सुरवसे, गोविंद सुर्यवंशी, रामलिंग पटसाळगे, विलास सुर्यवंशी, रोहित बनसोडे, प्रकाश गायकवाड, मारुती जाधव, डॉ. शेषेराव शिंदे, अँड. शकील पटेल, शैलेज गोजमगोंडे, अजित पाटील कव्हेकर, रामभाऊ गाडेकर, मैनोद्दीन मनियार, अजय कांबळे, प्रमोद ढेरे, अमोल सोनकांबळे, माधवराव पौळ, अँड. अजित माकणे, तुषार सोमवंशी.
याचबरोबर, आज दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त फोनवर अशोकराव पाटील निलंगेकर यांना अनेक मान्यवर नेत्यांनी साहेबांच्या कार्याची आठवणींना उजाळा दिल्या.
यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष ना. अशोकराव चव्हाण, माजी राज्यपाल अँड. शिवराज पाटील चाकुरकर, ना. यशोमती ठाकूर, ना. बाळासाहेब थोरात, माजी आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राजीव वाघमारे, कर्नाटकचे माजी मंत्री इश्वर खंड्रे, यांनी निलंगेकर साहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर शुभेच्छा दिला.
हा कार्यक्रम यशस्वी नियोजन करण्याकरिता माजी बांधकाम सभापती सिराज देशमुख, अशोकराव पाटील मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे, नवनाथ कुडुंबले, महेश चिक्राळे आदींनी मेहनत घेतली.