26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeकृषी*विलास साखर कारखान्याच्या महिला मेळाव्यास प्रतिसाद*

*विलास साखर कारखान्याच्या महिला मेळाव्यास प्रतिसाद*

विलास सहकारी साखर कारखाना वतीने

ऊसउत्पादक महिलांचामहिला मेळावासंपन्न

महिलांनी आधुनिक ऊस शेतीसोबत

कृषीपुरक जोडधंदा करणे काळाची गरज

चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख

लातूर (प्रतिनिधी) गुरूवार दि. २४ ऑगस्ट २०२३:

शेती करीत असताना शेतीसोबत पशूपालन, दुग्धव्‍यवसाय सारखे जोडधंदे केल्यास शेती देखील परवडते. महिलांनी आधुनीक पध्दतीने शेती केल्यास आर्थिक उत्पन्न वाढेल, घरात आर्थिक स्थिरता येईल याकरीता आधुनिक ऊस शेतीसोबत कृषीपुरक एखादा तरी जोडधंदा करणे ही काळाची गरज आहे, असे विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यानी म्हटले आहे. 

विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळी, येथे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक महिला सभासदासाठी ‘ऊस पीक लागवड व संगोपन तंत्रज्ञान’ या विषयावर ‘महिला मेळावा’ गुरुवार, दि. २४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अध्यक्षीय मनोगतात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अगोदर ऊसशेती यांत्रीकीकरणासाठीची लागणारे यंत्र व अवजारे प्रर्दशनाचे त्यांनी उदघाटन केले.

यावेळी व्यासपिठावर रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन श्री. गणपतराव बाजूळगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, ट्वेन्टीवन शुगर लि. चे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र व्ही. काळे, कार्यकारी संचालक श्री. संजीव देसाई, डॉ. सारीका देशमुख, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूणेचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जे.एम. रेपाळे, वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सौ. प्रिती देशमुख, संशोधन अधिकारी श्री. सचिन पाटील, वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सौ. सुधा घोडके, डॉ. जी.एस. कोटगिरे, सुनिता आरळीकर, सीमा क्षिरसागर, सोनाली थोरमोटे, शितल फुटाणे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख पुढे म्हणाल्या, शेतीत महिलांचे योगदान मोठे आहे. घरातील शेतीच्या कामाची जबाबदारी महिलांच्या हाती आल्यास अधिक चांगले उत्पन्न मिळेल. महिला शेती सचोटीने व काटकसरीने करतात त्यांना त्या कामात आवड आहे. यामुळे शेतीच्या कामाची जबाबदारी घेवून आधूनिक ऊसाची शेती करावी. येणाऱ्या काळात येथील महिलांना ऊसाची आधुनिक शेती करता यावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले. 

हंगामानूसार ऊस लागवडीसाठी

सुधारीत वाणाची ऊस जात निवडावी

डॉ.जे.एम. रेपाळे

या ऊस उत्पादक मेळावा प्रसंगी, ऊसाची सुधारित जाती आणि हंगामनिहाय ऊस जातीचे नियोजन याविषयावर बोलताना डॉ.जे.एम. रेपाळे म्हणाले, ऊसाच्या जातीनुसार ऊस हंगामाची निवड करावी लागते. ऊसाच्या सर्व जातीत गुणदोष आहेत मात्र कोणत्या हंगामात, जमिनीचा प्रकार, ऊस लागवड करीत आहोत याप्रमाणे ऊस जातीची निवड करावी. ऊसाची जात निवडत असताना सुधारीत वाणाची आणि शूद्ध बेणेची निवड करावी ऊसाची विविध जाती आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यात 86032, 671, 8005, या वाणाचा प्रसार अधिक आहे. येथिल कारखान्याने लागवड पद्धती आणि ऊसाच्या वाणाचा प्रसार केल्यामुळे साखर उतारादेखील चांगला आहे असे सांगितले.

जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी

मातीचे संगोपन करावे

डॉ. प्रिती देशमुख

वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रिती देशमुख, ऊस पिकासाठी आधुनिक लागवड पद्धती आणि एकात्मिक खत व्यवस्थापन या विषयावर बोलताना म्हणाल्या ऊस शेतीच नाहीतर कोणत्याही पिकपद्धतीसाठी जमिनीची सुपिकता महत्वाची आहे. एखादी आई बाळाचे संगोपन करते त्याप्रमाणे जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी मातीचे संगोपन करावे. निसर्गता जमिन स्थिर आहे. ती वाढणार नाही. याकरीता येणाऱ्या काळात जमिनीची उत्पादकता वाढवावी लागेल. ही जमिनीची सुपिकता टिकविण्यासाठी जैविक आणि सेंद्रिय खताचा वापर करावा. सेंद्रिय खत महाग असला तरी, विकत न घेता. शेतात तयार करता येतो. बायोकंपोष्टचा वापर करावा. सेंद्रिय खताच्या मदतीने जिवाणू वाढवावेत. सुपिकता कायम ठेवण्यासाठी जैविक सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतूलित वापर करावा. आपल्या शेतीचे स्वरूप समजण्यासाठी वेळोवेळी मातीपरीक्षण करावे. यातून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास, ऊस शेतीत चांगले उत्पन्न मिळते असे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रिती देशमुख यांनी सांगितले.

जमिनीच्या सुपिकतेसाठी

पाणी वापराचे नियोजन करावे

सचिन पाटील

संशोधन अधिकारी सचिन पाटील यांनी ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले ते म्हणाले ऊस पिकासाठी पाणी हा घटक महत्वाचा आहे. याकरीता ऊस लागवडीपासून पाणी देण्याचे नियोजन करावे. ऊसाला पाणी जमिनीचा प्रकार पिकाचे वय यानूसार द्यावे लागेल पाणी पारंपारीक किंवा आधूनिक पद्धतीने दिले तरी ऊसाच्या गरजेनूसार पाणी द्यावे, पाण्याचा अतिवापर करू नये, पाण्याचा अतिवापर झाल्यास जमिनीची सुपिकता नष्ठ होते असे सांगितले.

याप्रसंगी बोलताना शास्त्रज्ञ डॉ.सौ.सुधा घोडके यांनी मातीचे आरोग्य वाढविण्यासाठी जिवाणू खताचा वापर करावा असे सांगितले. ऊस शेतीमध्ये रासायनिक खताचा अतिवापर टाळावा याला पर्यायी खत म्हणून सेंद्रिय आणि जिवाणू खताचा वापर करावा. शेतातील पाचट जाळून न टाकता ती कुजविल्यास चांगला खत तयार होतो असे सांगितले. तर शेवटी बोलताना वरीष्ठ ऊस रोग शास्त्रज्ञ डॉ.श्री. कोटगिरे म्हणाले ऊस लागवड करत असताना वेगवेगळ्या ऊस जातीचा वापर करावा. वातावरण बदलामुळे ऊसालादेखील वेगवेगळ्या रोग व किडींचा प्रादुर्भाव होत आहे. याकरीता ऊसाचे उत्पन्न चांगले घेण्यासाठी रोग ओळखून रोग नियंत्रण करावे विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास वेळीच काळजी घ्यावी.

यावेळी प्रारंभी लातूर जिल्हा मध्यवर्तीचे फिल्ड ऑफिसर अंगद मगर यांनी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महिला, महिला बचत गट आणि शेतीचा जोडधंदा करण्यासाठी सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली. महिला मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हा.चेअरमन रविंद्र व्ही. काळे यांनी केले. कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. राहुल इंगळे पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन संचालक अनंत बारबोले यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत भिसे वाघोली, आखरवाई, चिखुर्डा, कासारखेडा, सिकंदरपूर, खंडाळा, जोडजवळा, गातेगाव, येथील महिला पदाधिकारी रेश्मा गंभिरे, कमलबाई शिंदे, शितल झाडके, सुनंदा झाडके, विनिता बावणे, सौ. बुलबुले, दैवशाला राजमाने यांनी चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, रंजीत पाटील, गोविंद डुरे, सुर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, आदी उपस्थित होते. 

बाईपण भारी देवाप्रमाणे ऊस मेळाव्यास

असलेली महिलांची गर्दी कौतुकास्पद

गेल्या काही दिवसापासून पाहतोय बाईपण भारी ग देवा या मराठी चित्रपटासाठी गेल्या काही दिवसापासून महीलांची प्रचंड गर्दी होत आहे. अगदी अशाच प्रकारची गर्दी येथे विलास सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या ऊस उत्पादक महिला मेळाव्यासाठी झाली आहे. या अनुषंगाने वसंतदादा शुगर इ. पूणे येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रिती देशमुख म्हणाल्या, ऊस शेतीमध्ये कार्यरत महिलांसाठी राज्यात अनेक ऊस मेळावे होतात. पण विलास सहकारी साखर कारखान्याने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून वैशालीताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेला हा मेळावा ऐतिहासिक आणि सर्वांनी आदर्श घ्यावा असा आहे. 

—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]