· ऊसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा
ना. अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन
विलास सहकारी साखर कारखाना सर्वसाधारण
सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
लातूर प्रतिनिधी (दि. २४ सप्टेंबर २१)यावर्षी निसर्ग प्रसन्न आहे त्यामुळे आगामी दोन वर्ष ऊसाची चांगली उपलब्धता राहणार आहे. साखर, इथेनॉल आणि इतर उपपदार्थांना चांगली मागणी आहे. या अनुकुल परिस्थितीत कारखाने अधिकाधिक कार्यक्षमेतेने चालवून ऊसऊत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवुन दयावा, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विलास सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित लातूर नजीकच्या निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ना. अमित विलासराव देशमुख बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती वैशाली विलासराव देशमुख होत्या. या सर्वसाधारण सभेत लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, व्हा. चेअरमन रविंद्र व्हि. काळे, युनीट १ चे कार्यकारी संचालक संजीव देसाई, युनीट २ चे कार्यकारी संचालक आत्माराम पवार सर्व संचालक, मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्याचे आजी व माजी पदाधिकारी शेतकरी सभासद, कर्मचारी, कामगार यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. २४ सप्टेंबर २१ रोजी दुपारी १ वाजता खेळीमेळीच्या वातावरणात कोवीड १९ मार्गदर्शक नियमावलीचे पालन करीत पार पडली.
माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या प्रेरणेने उभ्या राहिलेल्या या कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, कर्मचारी, कामगार या सर्वांचे हित जोपासण्याचे काम आजवर घडले आहे, असे सांगून या प्रसंगी पूढे बोलतांना ना. देशमुख म्हणाले की, कोणताही साखर कारखाना हा शेतकऱ्यांचे मंदिर असतो. या साहेबांच्या विचारांचा वारसा यापुढेही जपला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे उपलब्ध पाण्याचे न्यायिक पद्धतीने वाटप होईल आणि या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. साखर आणि इथेनॉल तसेच इतर उपपदार्थांना यावर्षी चांगला उठाव आहे. या अनुकूल परिस्थितीचा लाभ घेत शेतकरी सभासद आणि इतर घटकांच्या जीवनात चांगले दिवस यावेत यासाठी कारखाना व्यवस्थापनाने मनापासून प्रयत्न करावेत. आता दोन वर्ष उसाची चांगली उपलब्धता आहे. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षमतेत वाढ करावी, अधिकचा साखर उतारा मिळवावा, काटकसर आणि शिस्तबद्ध कामकाजातून यावर्षी उच्चांकी कामगिरी नोंदवावी, पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे उसाचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्याच्या ऊस विकास विभागाने विशेष कार्यक्रम आखावा, या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. विलास साखर कारखाना म्हणजे एक कुटुंब आहे, त्यामुळे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, कर्मचारी, कामगार व त्यांचे कुटुंबीय या सर्व घटकांचे लसीकरण करून घेण्यासाठी कारखान्याने गळीत हंगामापूर्वी विशेष कार्यक्रम राबवावा व त्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी पालकमंत्री ना. देशमुख यांनी केले
प्रारंभी आदरणिय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन सर्व संचालकांनी केले. यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज युनीट १ चे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी, अहवाल वाचन व्हा. चेअरमन रविंद्र व्ही. काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल इंगळे यांनी तर आभार संचालक गुरूनाथ गवळी यांनी मानले.
कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, आनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रंजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले यांच्यासह कारखाना सभासद, शेतकरी, ऊस तोडणी ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी व कामगार सहभागी होते.