18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeकृषी*विलास साखर कारखाना उसाला २७८३रुपये भाव*

*विलास साखर कारखाना उसाला २७८३रुपये भाव*

विलास सहकारी साखर कारखाना युनिट – २ कडून

शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वांधिक २७८२ रूपये विक्रमी भाव

ऊदगीर, जळकोट, अहमदपूर चाकूरसह परीसरातील 

शेतकऱ्यांमध्ये आंनदोत्सव

शेतकऱ्यांना ऊसदरापोटी १५० कोटी रूपये मिळणार

तिसरा हप्ता रू. २५०/- अदा

  • उदगीर, जळकोट, चाकुर, शिरुर ताजबंद व अहमदपुर येथील ऊसाचे गाळप
  • कारखाना वाटचालीत उच्चांकी गाळप व साखरेचे उत्पादन 
  • मराठवाडयात ऊसाला सर्वांधीक विक्रमी प्रतिटन २७८२ रूपये भाव 
  • आसवनी प्रकल्प लवकरच कार्यान्वित
  • पुढील हंगामाची तयारी सुरू 

लातूर प्रतिनिधी १६ जूलै २०२२ : 

   लातूर जिल्हयातील ग्रामिण भागात आर्थिक परीवर्तन घडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातून स्थापन झालेल्या मांजरा परीवारात सहभागी झाल्यानंतर तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनीट – २ मध्ये या वर्षात गाळप झालेल्या ऊसाला सर्वाधिक म्हणजे प्रतिटन २७८२ रूपये एवढा विक्रमी भाव जाहीर करण्यात आला आहे. यातील प्रतिटन २५० रूपयाचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.

शेतक-यांच्या हितासाठी उदगीरसह चार तालुक्यातील ऊसाचे गाळप

  लातूर आणि परीसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परीवर्तन घडविण्यासाठी प्रारंभी मांजरा कारखान्याची उभारणी झाली. केवळ शेतकऱ्यांचे हित डोळयासमोर ठेऊन हा कारखाना उत्कृष्ठरीत्या चालविण्यात आला. गाळप ऊसाला सर्वाधीक भाव देण्याची परंपरा सुरू झाली. यातून ग्रामिण भागातील जीवनमानात बदल घडून आला परिणामी मांजरा परीवराचा विस्तार होऊन विलास, रेणा, जागृती, मारूती महाराज या कारखान्यांची उभारणी झाली. या कारखान्या सोबतच उदगीरसह जळकोट, चाकुर, शिरुर ताजबंद व अहमदपुर परीसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडावा म्हणून तोंडार येथील बंद असलेला कारखाना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या विलास कारखाना मार्फत घेऊन्‍ मांजरा परीवारात सहभागी करून घेण्यात आला. यावर्षी हा कारखाना उत्तमरीत्या चालला असून या परीसरातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना सर्वांधीक म्हणजे २७८२ रूपये एवढा विक्रमी भाव जाहीर करण्यात आला आहे. आजपर्यंत दोन हप्त्यात प्रतिटन २४०० रूपये शेतकऱ्यांना मिळाले असून आता २५० रूपये प्रतिटनचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे.     

  गतवर्षी पर्जन्यमान मुबलक प्रमाणात झाल्यामुळे सर्वच कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली होती. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील अतिरिक्त उसाचे क्षेत्र लक्षात घेता, शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून उदगीरसह जळकोट, चाकुर, शिरुर ताजबंद व अहमदपुर येथील ऊसाचे गाळप करण्यात आले. या संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू ठेवावेत अशी भूमिका माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी घेतली. कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचे संपूर्ण गाळप झाल्यानंतरच गाळप हंगाम बंद केला.

कारखाना वाटचालीत उच्चांकी गाळप व साखरेचे उत्पादन

 विलास साखर कारखाना युनीट – २ चा गळीत हंगाम आजपर्यंतच्या सर्व हंगामात विक्रमी गाळपाचा ठरला आहे. या गळीत हंगामात ५ लाख ३७ हजार मेटन ऊसाचे गाळप झाले असून ६ लाख ५५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून साखर ऊतारा १२.२० इतका आहे.या हंगामात गाळप क्षमतेचा १२५ टक्के वापर करण्यात आला. कारखाना आसवनी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून उपपदार्थ प्रक्रीया प्रकल्प लवकरच सुरू होत आहे.

पुढील हंगामाची तयारी सुरू 

 येणाऱ्या गळीत हंगामात देखील ऊसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. याकरीता ६ लाख मेटन ऊस गाळपाचे उदिष्ट समोर ठेऊन आवश्यक तोडणी वाहतूक यंत्रणेचे व हार्वेस्टरचे करार पुर्ण करण्यात आले आहेत. कारखाना हंगामात पुर्ण क्षमतेने चालवण्याच्या दृष्टीने कारखाना मेन्टेनन्स कामे प्रगतीपथावर आहेत.

  अंतिम दर रु. २७८२/- त्यापैकी रू. २५०/- चा ऊस दर हप्ता अदा

  गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये विलास साखर युनिट – २ कडून ५ लाख ३७ हजार मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसास कारखान्याकडून दोन हप्यात रु. २४००/- प्रमाणे रु. १२८ कोटी ८८ लाख अदा करण्यात आले असून तिसरा हप्ता रु.२५०/- प्रमाणे १३ कोटी ४२ लाख अदा करण्यात येत असल्याची माहीती विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांनी दिली आहे.  

 शेतकऱ्यांना अधिकात अधिक लाभ मिळवून देण्यासाठी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी घेतलेल्या भुमिके बददलही व्हा. चेअरमन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांनी संचालक मंडळ तसेच शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

—–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]