38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeसहकार*विलास सहकारी साखर कारखाना युनिट - २ चे रोलर पूजन*

*विलास सहकारी साखर कारखाना युनिट – २ चे रोलर पूजन*

*चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते*

*विलास सहकारी साखर कारखाना युनिट चे रोलर पूजन*

लातूर प्रतिनिधी १९ जूलै २३:

विलास सहकारी साखर कारखाना युनिट – २ तोंडार ता. उदगीर येथील येथील कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ ची तयारी अंतीम टप्पयात आली असून तांत्रीक कामे पुर्णत्वास आली आहेत. या अनुषंगाने कारखाना मील रोलरचे विधीवत पुजन कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकाच्या उपस्थितीत करण्यात आले. 

यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र व्यंकटराव काळे, कार्यकारी संचालक ए. आर. पवार लातूर जिल्हा बँकेच्या संचालीका लक्ष्मीबाई भोसले, लातूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विजय निटुरे व संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, युवराज जाधव, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, अनिल पाटील, रंजीत पाटील, गोविंद डूरे, सुर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, भारत आदमाने, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, निमंत्रीत संचालक सर्वश्री रामराव बिरादार, कल्याण पाटील, ज्ञानोबा गोडभरले, पंडीत ढगे, विनोबा पाटील, राजेंद्र पाटील, मारोती पांडे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रिती भोसले, मधुकर एकूर्गेकर यांची उपस्थिती होती.

लोकनेते विलासरावजी देशमुख यांची प्रेरणा, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचे नियोजन तसेच कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे नेतृत्त्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना युनिट – २ प्रत्येक हंगामात विक्रमी गाळप उदिष्ट पूर्ण करीत आहे. 

यासाठी येणाऱ्या गळीत हंगाम २३-२४ साठीची देखील अंतर्गत तांत्रीक व साफसफाईची कामे वेळेवर केली गेली आहेत, ही सर्व कामे अंतीम टप्प्यात आली आहेत, अशी माहिती कार्यकारी संचालक ए.आर.पवार यांनी दिली. तर कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऊसातोडणी व वाहतूक यंत्रणाची उभारणी करण्यात आली आहे, असे कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे यांनी सांगीतले.

कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी याप्रसंगी कारखाना अंतर्गत सुरू असलेल्या कामाची व कारखाना उभारणी करीत असलेल्या आसवनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून माहीत घेतली. तसेच सर्व संचालकांच्या उपस्थितीत खाते प्रमुख्, विभाग प्रमुख्‍ व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी, कारखान्याचे ऊसउत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थीत होते.

—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]