मांजरा परीवारातील साखर कारखाने,
जिल्हा बँक ही विकासाची मंदिरे
ती वाढली आणि टिकली पाहिजेत
सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपराव देशमुख
झेड.एल.डी.प्रकल्पाच उदघाटन
लातूर प्रतिनिधी ५ नोव्हेंबर २०२२ :
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या व्यापक दूरदृष्टीमुळे व अचूक निर्णयक्षमतेमुळे सहकार क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती झाली. दुष्काळी भागाचे नंदनवन करून इतल्या परिसराचा त्यांनी कायापालट केला. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली. म्हणूनच मांजरा परिवारातील सर्व साखर कारखाने, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही इथली विकासाची मंदिरे आहेत. ती आपण सर्वांनी जपली पाहिजे आणि लातूरचा नावलौकिक आणखी वाढवला पाहिजे, असे प्रतिपादन सहकारमहर्षी व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे केले.
वैशालीनगर, निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याचा २२ वा गळीत हंगाम शुभारंभ व झेड.एल.डी.प्रकल्पाचे उदघाटन शनिवार दि. ५ नोव्हेबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मा.श्री.अमित विलासरावजी देशमुख (आमदार विधानसभा, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री), मा.श्रीमती वैशाली विलासराव देशमुख (चेअरमन, विलास साखर कारखाना लि.), मा.श्री.धिरज विलासरावजी देशमुख (आमदार, लातूर ग्रामीण, चेअरमन, लातूर जिल्हा म.स.बॅक लि.,),मा.श्री.वैजनाथराव शिंदे (माजी आमदार),मा.श्री.त्र्यंबकराव भिसे (माजी आमदार),मा.श्री.सर्जेराव मोरे (चेअरमन,रेणा स.सा.कारखाना),मा.श्री.गणपतराव बाजुळगे (चेअरमन, संत शिरोमणी मा.म.स.साखर कारखाना), मा.श्री.ॲड.प्रमोद जाधव (उपाध्यक्ष, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक), मा.श्री.श्रीशैल उटगे (व्हा.चेअरमन,जिल्हाध्यक्ष वि.वि.देशमुख मां.शे.स.साखर कारखाना), मा.श्री. अनंतराव देशमुख (व्हा. चेअरमन रेणा सहकारी साखर कारखाना),मा.श्री. विजय देशमुख (व्हा.चेअरमन टवेन्टिवन शुगर्स लि.),व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक एस.आर.देसाई, मा.श्री.शाम भोसले, (व्हा.चेअरमन संत शिरोमणी मामस साखर कारखाना),माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, माजी चेअरमन धनंजय देशमुख यांच्यासह मांजरा परीवरातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, कार्यकारी संचालक आदी उपस्थित होते.
या प्रसंगी पूढे बोलतांना श्री. दिलीपराव देशमुख म्हणाले, मागील हंगामात अतिरिक्त ऊस असल्याने अनेक अडचणींवर मात करीत मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांनी चांगले काम केले. उसतोड लांबत असल्याने अनेक शेतकरी चिंतेत होते. पण, सर्वांनी संयम ठेवला. हंगाम यशस्वी पार पडला. चांगला दर ऊस उत्पादकांना मिळाला. सामूहिक प्रयत्नांमुळे हंगाम यशस्वी होतो. तसेच प्रयत्न आपण सर्वांनी यंदाही करू असे सांगितले. आजचा काळ बदलला आहे केवळ साखरेचे उत्पादन घेऊन चालणार नाही तर आसवनी प्रकल्प, सहविजनिर्मीती प्रकल्प उभारून इथेनॉलचे उत्पादन घेणे काळाची गरज आहे. आपण उभा केलेला सहकार आणि साखर उदयोग हे आपले वैभव आहे, आपल वैभव जपण, वाढवण्याचे काम केले पाहिजे असे शेवटी सहकारमहर्षी व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी ठेऊन काम केल्या मुळेच
मांजरा कारखाना सारख्या मातृसंस्था सुरु आहेत
आदरणीय विलासरावांनी सांगितलेला
बांधिलकीचा विचार पूढे घेऊन जायचा आहे
अमित विलासराव देशमुख
सहकार क्षेत्रात आणि साखर उदयोगात आपण शेतकऱ्यांशी बांधिलकी मानून पारदर्शकपणे कामकाज करीत आहोत. यामुळे गेली ४० वर्ष उभा राहिलेल्या या संस्था दिमाखात सुरू आहेत. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी हाच विचार आणि कार्य आपल्याला दिल. तेच आपण लोकांसाठी पूढे घेऊन जात आहोत. या सोबत सामाजिक बांधिलकी ठेऊन चांगले केल्या मुळेच मांजरा कारखाना सारख्या मातृसंस्था सुरु आहेत. हाच बांधिलकीचा विचार आपण पुढे घेऊन गेले पाहिजे असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.
विलास कारखाना गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी पूढे बोलतांना, विलास कारखान्याचा २२ वा गळीत हंगाम संपन्न होतोय कारखाना उभारणी पासून काळ कसा पूढे गेला हे देखील कळले नाही. असे सांगून तो काळ आजही आठवतोय कारखाना उभारणीचा निर्णय झाला पण खरच होणार का अशी कुजबुज होती, याकडे आम्ही फारसे लक्ष दिले नाही. आदरणीय विलासराव देशमुख व आदरणीय दिलीपराव देशमुख यांनी उभारलेल्या मांजरा कारखाना कार्यक्षेत्रात दुसरा कारखाना सुरु करणे जिकीरीचे होते. लोक या नव्या कारखान्यावर विश्वास ठेवतील की नाही असे वातावरण होते. पण त्या काळातही ऊसाचे उत्पादन अधिक झाले, यामुळे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कारखाना उभारणीचे काम सुरू झाले. हा कारखाना उभारतांनाच विलासराव देशमुख साहेबांचे नाव दयावे असा कारखान्याच्या नावाचा प्रस्ताव घेऊन आम्ही गेलो, पण आपल्या नावाने हा कारखाना व्हावा असे साहेबांना वाटले नाही म्हणून त्यांच्या कार्याच प्रतिक विकास कारखाना असे नाव दिले, आज त्यांचे पून्हा विलास असे नामकरण झाले आहे. या माध्यमातून त्यांची प्रेरणा, नेतृत्व, विचार यावर प्रवास सुरु आहे. त्याच हे नाव आता जपल पाहिजे म्हणून या कामात सर्वांची जिमेदारी वाढली आहे असे त्यांनी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
विलास कारखाना माध्यमातून गेल्या हंगामात आपण विक्रमी गाळप केले आणि उंच्चाकी दर दिला आहे. आपला विलास कारखाना हा मराठवाडा व विदर्भ विभागात प्रथम क्रमाक पटकावतो आहे, हे सगळ्याच्या श्रमाचे फलीत आहे सांगून भविष्यात देखील आपली कामगिरी उंचावतच जायला हवी यासाठी सर्वांनी असेच परिश्रम घ्यावे अशी अपेक्षा या प्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
विलास कारखाना उभारणी करतांना राज्य शिखर बॅके ऐवजी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेने कारखान्याला लीड बँक म्हणून कर्जपुरवठा केला. यापुर्वी एखादया जिल्हा बॅकेने असे कर्ज दिले नव्हते. सहकारात असे कधी घडले नव्हते येथून पुढेच या नव्या पर्वाला सुरुवात झाली. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या मुळे त्या काळात एक रकमी कर्जपुरवठा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला मिळाला.
विलास कारखाना सारख्या संस्था शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या विकासाच्या संस्था आहेत. या संस्था वाढल्या पाहिजेत त्या टिकल्या पाहिजेत अशा संस्था टिकल्या तर शेतकऱ्यांचा संसार टिकणार आहे असेही यावेळी बोलतांना माजी मंत्री आमदार देशमुख यांनी सांगितले सांगितले.
मागील वर्षी आपल्या कारखान्यानी ६० लाख मे.टन ऊसाचे गाळप केले. तरी देखील कारखाने जास्त काळ चालवावे लागले. लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांचा ऊसाचे वेळेवर गाळप व्हावे याकरीता मांजरा परीवारातील सर्व कारखान्याची गाळप क्षमता वाढवली आहे. यामुळे परीवारातील सर्व कारखान्याची मिळून ५ हजार मे.टन प्रती दिन एवढी गाळप क्षमता वाढली आहे. या गाळप क्षमता वाढीतून एका नवीन कारखान्याची उभारणी झाली आहे. चांगला ऊसदर मिळावा यासाठी चांगल्या ऊसाच्या सुधारीत व नव्या जातीची लागव्ड करावी, अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस जातीची लागवडीसाठी निवड करावी. ऊसाचे एकरी उत्पादन वाढवावे यामुळे आपल्याला चांगला ऊसदर देणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जावा, त्यांना भाव अधिकात अधिक मिळावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
विलास कारखान्याची साखर सामासमुद्रापार
विलास कारखान्याने साखर निर्यात धोरणाचा पूरेपूर फायदा घेतला. गेल्या गळीत हंगामात जेवढी साखर उत्पादीत झाली तेवढी साखर परदेशात निर्यात करण्यात आली आहे. ही साखर अरब राष्ट्र, युरोपीयन देशाच्या बाजारपेठेत पोहोचली आहे. लातूर येथील शेतकऱ्यांच्या ऊसची, विलास कारखान्याची ही साखर जगभरात जाते आहे, सातासमुद्रा पलीकडे साखर गेली आहे. हे ऐकण्यासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेब असते तर त्यांना किती तरी आनंद झाला असता.
‘इंधन उत्पादक शेतकरी’ ही नवी ओळख असेल
आमदार धिरज विलासराव देशमुख
गळीते शुभारंभ कार्यक्रमात बोलतांना, आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले, मांजरा परिवाराने चालू गळीत हंगामाचे सुक्ष्म नियोजन केले असून नेहमीप्रमाणेच यंदाही उसाचे वेळेत गाळप होईल. चालू गळीत हंगामातही मांजरा परिवारातील कारखाने चांगला एफआरपी देण्याची स्पर्धा करीत आहेत. आपले साखर कारखाने नवनवे बदल आत्मसात करीत असल्याने येणाऱ्या काळात येथील शेतकरी हा ‘इंधन उत्पादक शेतकरी’ बनेल. साखरेसह इथेनॉल निर्मितीत, उच्चांकी एफआरपीत लातूर आणखी अग्रेसर राहील, याची खात्री आहे.
शेतकरी हित हा ध्यास असल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांबरोबरच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उत्तम वाटचाल सुरू आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भांडवल देणे, पतपुरवठा करण्यासाठी सदैव सक्षम आहे. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च वाढल्याने त्यांचा वाढीव खर्चाचा भार कमी करण्यासाठी जिल्हा बँकेने बिनव्याजी भांडवल उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
झेड.एल.डी.प्रकल्पाचा शुभारंभ
लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याचा २२ व्या गळ्यात हंगाम शुभारंभ प्रसंगी कारखाना परिसरात उभारलेल्या झेड.एल.डी.प्रकल्पाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आला, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार मा.श्री.अमित विलासरावजी देशमुख, कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय वैशालीताई देशमुख, लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत झाला,
अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या विलास साखर कारखान्यात आता सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे., प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेले अशुद्ध पाणी पुन्हा बगॅस सोबत इंधन म्हणून वापरले जाईल, इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्यामुळे आता वर्षभर डिस्टलरी चालू राहणार आहे, इथेनॉलचे उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला अधिकचा भाव देणे शक्य होणार आहे, पाण्याचा पुनर्वापर शक्य झाल्यामुळे पाण्याची मोठी बचत होणार आहे, या प्रकल्पामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणालाही आळा बसणार आहे.
श्री.दिलीपरावजी देशमुख (सहकार महर्षी, माजी क्रीड व युवक कल्याण मंत्री) यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेने सहकारातील नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला, या बददल सर्व सभासद, ऊसउत्पादक, शेतकऱ्यांच्या वतीने मा.श्री.अमित विलासरावजी देशमुख (आमदार विधान परिषद, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख याच्या शुभहस्ते व मा.श्री.अमित विलासरावजी देशमुख (आमदार विधान परिषद, माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री), मा.श्रीमती वैशाली विलासराव देशमुख (चेअरमन, विलास ससा कारखाना लि.), मा.श्री.धिरज विलासरावजी देशमुख (आमदार, लातूर ग्रामीण, चेअरमन, लातूर जिल्हा म.स.बॅक लि.,) यांच्या प्रमुख उपस्थितीत झेड.एल.डी.प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले, ऊसाने भरलेल्या वाहनाचे पूजन, हार्वेस्टरचे पूजन करण्यात आले व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले, संभाजी सुळ, विशाल पाटील, नवनाथ काळे, प्रविण पाटील, कार्यकारी संचालक रनवरे, मोरे, बरमदे आदीसह अधिकारी, शेतकरी, सभासद, ऊसउत्पादक आदी उपस्थित होते. प्रारंभी आदरणीय लोकनेते विलास देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार मा.श्री.त्र्यंबकराव भिसे, चेअरमन गणपतराव बाजूळगे, व्हा.चेअरमन रविद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल इंगळे पाटील तर आभार संचालक अनंत बोरबोले यांनी मानले.