६ लाख ३१ हजार ५५१ व्या साखर पोत्याचे
ना. अमित देशमुख यांच्या हस्ते पूजन,
विलास कारखाना गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरू
कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे
लवकर गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे
ना. अमित विलासराव देशमुख
लातूर ( प्रतिनिधी )दि. ३०
राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि सर्व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत विलास सहकारी साखर कारखाना ली.च्या चालू गळीत हंगामातील ६ लाख ३१ हजार ५५१ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे लवकरात लवकर गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचनाही याप्रसंगी ना. देशमुख यांनी दिल्या आहेत.
यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रजीत पाटील, गोविंद डूरे, सुर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर आदीसह कारखान्यातील खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
साखर पोतीच्या पूजनानंतर विलास सहकारी साखर कारखानाच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व ना. अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत संचालक मंडळ व विभाग प्रमुखांची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत कारखाना अधिकाधिक कार्यक्षमतेने चालवून दररोज जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे निर्देश ना. देशमुख यांनी यावेळी दिले.
शनीवर दि. २९ जानेवारी रोजी सकाळी विलास कारखाना स्थळी राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि सर्व संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत ६ लाख ३१ हजार ५५१ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. विलास सहकारी साखर कारखाना ली.चा गळीत हंगाम सन २०२१-२२ ची सुरूवात गतीने झाली असून हंगामात २ लाख ९२ हजार ५९० मे. टन ऊसाचे गाळप झाले असून ३ लाख १६ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
विलास सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम सन २०२१-२२ ची सुरूवात गतीने झाली आहे. गळीत हंगामात सभासद आणि कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत आहे. कारखाना चालू गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल माजी मुख्यमंत्री आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेने, सहकारमहर्षी माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख, राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. या हंगामात गाळप झालेल्या सभासद व शेतकऱ्यांच्या ऊसाला विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परीवाराच्या धोरणा प्रमाणे गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता २ हजार २०० रूपये अदा करण्यात येत आहे.
गळीत हंगामाची यशस्वी वाटचाल सुरू असल्यामुळे सर्व सभासद, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, कामगार, तोडणी – वाहतुक व पुरक कामाचे कंत्राटदार यांचे राज्याचे वैदयकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या हंगामात ऊसाचे क्षेत्र अधिक असल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे लवकरात लवकर गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे व त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा सूचनाही याप्रसंगी ना. देशमुख यांनी सर्व संचालक, खातेप्रमुख आणि विभाग प्रमुख यांना दिल्या आहेत
कारखाना गळीत हंगाम सुरू असल्यामुळे ना. अमित विलासराव देशमुख यांनी सर्व संचालकासह कारखाना गळीत हंगाम सुरू असलेल्या प्रक्रीयेची माहिती घेतली, परिसराची व कारखान्यातील इसिनेरेशन बॉयलर, टर्बाइन, कूलिंग टॉवर, सीपीयू अंतर्भूत केलेल्या झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) प्रोजेक्टची पाहणी केली, या संदर्भाने संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.
——————-