कै. विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनाचा
आदरांजली कार्यक्रम कौटुंबिक पातळीवर मर्यादीत स्वरूपाचा
कोविड१९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमिवर, देशमुख कुटुंबियाचा निर्णय
लातूर प्रतिनिधी -कोरोना प्रादूर्भावाची परिस्थीती नियंत्रणात असली तरी अदयाप धोका टळलेला नाही, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरूच असून कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमीत्त १४ ऑगस्ट २१ रोजी बाभळगाव येथील विलासबाग येथे होणारा सामुहिक आदरांजलीचा कार्यक्रम रद्द करून कौटुंबिक पातळीवर मर्यादीत स्वरूपात करण्याचा निर्णय देशमुख कुंटूबियानी घेतला आहे.
आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमीत्त १४ ऑगस्ट रोजी दरवर्षी बाभळगाव येथील विलासबाग येथे सामुहिक आदरांजलीचा कार्यक्रम नियमीतपणे आयोजित केला जात असतो, मात्र यावर्षी ९ व्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम घेत असतांना. संपूर्ण देशभरात कोवीड१९ प्रादूर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी मार्गदर्शक सुचना लागू करण्यात आलेल्या आहेत. गर्दी जमा होवु नये यासाठी लागू असलेले प्रतिबंधात्मक नियम लक्षात घेता १४ ऑगस्ट २१ रोजी बाभळगाव येथे सार्वजनीक स्वरूपात आदरांजली कार्यक्रम घेता येणार नाहीत ही बाब लक्षात घेऊन फक्त कौटुंबिकस्तरावरच हा कार्यक्रम घेण्या बाबतचा निर्णय देशमुख परीवाराने घेतला आहे.
या संदर्भाने देशमुख कुटुंबीयाकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली असुन सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्याला आदरांजली अर्पण करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.