लोकनेते विकासरत्न विलासरावजी देशमुख यांना ७७ व्या जयंती निमित्त मांजरा साखर येथे आदरांजली व रक्तदान शिबीर संपन्न
लातूर – विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., विलासनगर ता.जि. लातूर येथे दि २६ मे, २०२२ रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ७७ व्या जयंती निमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सहकार महर्षी मा.श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब, चेअरमन तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीशैल उटगे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, कार्यलक्षी संचालक श्रीनिवास देशमुख, सर्व संचालक मंडळ, खाते प्रमुख, उप खाते प्रमुख, कर्मचारी व कामगार उपस्थित होते.

तसेच साहेबांच्या जयंती निमित्त कारखाना स्थळावरील सांस्कृतिक भवन येथे भालचंद्र ब्लड बँक, लातूर यांचे सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी आदरणीय साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिप प्रज्वलीत करून सदर रक्तदान शिबीरास प्रारंभ करण्यात आला. एकूण ५१ रक्तदात्यानी उत्स्फूर्तपणे रक्तदानात सहभाग नोंदविला.
