लातूर ;दि. २७( प्रतिनिधी )-
‘ बेटी बचाव बेटी पढाव ‘अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाइन वकृत्व स्पर्धेत मराठवाडा विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक लातूरच्या कु. आर्या विष्णू भोसले या विद्यार्थ्यांनीने पटकावले. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘ बेटी बचाव बेटी पढाव ‘ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या ऑनलाईन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आर्या विष्णू भोसले या विद्यार्थिनीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. चार हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते हे प्रात्यक्षिक वितरित करण्यात आले . या प्रसंगी बेटी बचाव बेटी पढाव प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या संयोजिका डॉ. शुभा फरांदे- पाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती .

मुंबई येथे नुकताच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बेटी बचाव बेटी पढाव प्रकोष्ठचे प्रदेश सदस्य डॉ. नागोराव बोरगावकर ,लातूर जिल्हा संयोजक किशोर दादा जैन , सहसंयोजक किशन बडगिरे, जिल्हा प्रकोष्ठ सदस्य श् राम कुलकर्णी , दिगंबर माने , मुंना हाश्मी , अँड किशोर शिंदे इत्यादी उपस्थित होते.
कुमारी आर्या भोसले हिच्या या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश भाजपा नेते , माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर , खासदार सुधाकर श्रगारे , आमदार रमेश कराड , आमदार अभिमन्यू पवार , भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे , तसेच डॉ. नागोराव बोरगावकर , किशोर जैन आदींनी अभिनंदन करून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.