मुंबई : प्रतिनिधी
आपल्या मंजुळ स्वरातून नवरसांवरील गाणी रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे अद्वैत कार्य जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर लेखिका विनीता तेलंग या आपल्या आगामी ‘रसमयी लता’ पुस्तकाच्या माध्यमातून लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील रसास्वादाचे दर्शन घडविणार आहेत. ‘विवेक प्रकाशन’तर्फे प्रस्तुत पुस्तकाचे लवकरच प्रकाशन करण्यात येणार आहे.
लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गीते गायली. त्यामुळे लतादीदींची कुठली गाणी सर्वोत्तम हे ठरवणे महाकठीण काम आहे. लतादीदींनी आपल्या स्वरांतून मराठी, हिंदी गाण्यांच्या या सुरांनी प्रत्येकालाच वेगवेगळ्या मूड्समध्ये साथ दिली. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर आणि भयानक रसांच्या विविध छटा आपल्या मधूर स्वरांतून अभिव्यक्त होण्याची किमया लतादीदींनी केली आहे. लतादीदींच्या नवरसांचा ‘रसभाव’ लेखिका विनीता तेलंग यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून हा विचार वाचक, रसिकांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुस्तकाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, लतादीदींचे रंगीत पोट्रेट, दुर्मिळ रंगीत फोटो आणि हार्ड बाइंडिंग कव्हर असणारे हे पुस्तक आहे. पुस्तकाची मूळ किंमत २५० रूपये असून, वाचकांना हे पुस्तक अवघ्या दोनशे रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : विवेक कार्यालय,०२४२२ २७८१०३५, ९५९४९६१८५८ आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून पुस्तक नोंदणी करू शकता.