26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeशैक्षणिक*विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायरव्याखानाचे आयोजन*

*विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायरव्याखानाचे आयोजन*

प्रेरणादायी वक्ते प्रबोधनकार प्रा. नितीन बानुगडे पाटील करणार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नांदेड-( वृत्तसेवा)-मेडीकल व इंजिनीयर प्रवेशासाठी अग्रगण्य संस्था असलेल्या आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याख्यानाचे आयोजन येत्या 12 डिसेंबर रोजी नांदेड व लातूर या दोन्ही ठिकाणी करण्यात आले असून विद्यार्थी कसा असावा व त्याने स्पर्धेला कसे सामोरं जावे यासह विद्यार्थ्यांशी निगडीत अशा अनेक विषयावर व समस्यांवर प्रा.बानुगडे पाटील मार्गर्शन करणार असल्याची माहीती आयआयबीचे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांच्या वतीने देण्यात आली आहे .
आयआयबी च्या वतीने नांदेड येथे मंगळवार दि 12 रोजी सकाळी साडेदहा वाजता डी मार्ट जवळील कॅनॉल रोडवरील चांदोजी पावडे मंगलकार्यालयात तर लातूर येथे सावेवाडी येथील दिवाणजी मंगल कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता, या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या अटीतटीच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपला विद्यार्थी टिकावा तसेच त्याच्यावर समाजशिल संस्कार व्हावेत या हेतूने इन्स्टिट्यूट कडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात त्याचाच एक हा भाग म्हणून मागील दोन दशकापेक्षा जास्त काळापासून आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मनावर आणि करीअर वर संस्कार घडवणाऱ्या मार्गदर्शन व प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानत सुरू असलेल्या आयआयबीच्या यशस्वी वाटचालीतील हा एक महत्वपूर्ण असा मार्गदर्शनपर कार्यक्रम असून ,12 वी बोर्ड ची परीक्षा येऊ घातले आहे. त्यानंतर लगेच नीट ,जेईई च्या परीक्षेला विद्यार्थ्यांना याच वातावरणात सामोरे जावे लागनार आहे. अभ्यासाचा ताण तणाव, व नीट, जेईई परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचे दडपण, यामुळे विध्यार्थ्यांसह पालकांवर दडपण असते, अशा परिस्थितीत ताणतणावावर मात करून या स्पर्धेच्या युगात कसे सामोरे जायचे याबाबत बानुगडे पाटील आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यात बानुगडे पाटील हे विध्यार्थी त्यांच्याशी निगडीत अशा विविध विषयावर मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन टिम आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]