*ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात 10 वी कौतुक सोहळा संपन्न
लातूर… आज नरहरे क्लासेसच्या वास्तूत 10 वी गुणगौरव व कौतुक सोहळा मा. तृप्ती अंधारे( शिक्षणाधिकारी,माध्यमिक जि.प.लातूर) यांच्या हस्ते तसेच
नरहरे सर( प्रकल्पप्रमुख ,ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प,लातूर)
मुख्याध्यापिका व संचालिका सविता नरहरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख नरहरे सर यांनी केले.प्रकल्पाचा मुख्य उद्देश मुलांना आनंददायी, कृतीयुक्त व अनुभवाधारित शिक्षण मिळावं यासाठी प्रकल्प काम करत आहे आणि करत राहील असा विश्वास नरहरे सरांनी मुलांच्या व पालकांच्या समोर व्यक्त केला.
यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून श्री मोगरगे यांनी ज्ञानप्रकाश प्रकल्पाबद्दल तसेच नरहरे सर व मॅडम यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. साक्षी , वरद , गायत्री या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या .
प्रमुख अतिथी मा. शिक्षणाधिकारी अंधारे मॅडम यांनी मुलांचे व पालकांचे विशेष अभिनंदन केले एका गोष्टीच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रातील प्राविण्य मिळवत त्या क्षेत्रातील ” राजा ” व्हा अशा शुभेच्छा दिल्या .
प्रकल्पाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आणि प्रकल्प प्रमुख नरहरे सर व मुख्याध्यापिका नरहरे मॅडम यांच्या कार्याचं वर्णन त्यांनी आधुनिक काळातील ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले असे केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचेता चाकूरकर आणि शिवकांता जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानप्रकाशचे पर्यवेक्षक अशोक गुरदाळे, विभाग प्रमुख प्रशांत शिंदे , वसंत पाटील , शुभदा पाठक , विठ्ठल अलमलकर , प्रदीप शिंदे ,खंडेराव हिंपळणारे , प्रकाश टिमके यांनी परिश्रम घेतले .
सर्व शिक्षक , निमंत्रित पालक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम वरून झाले त्यामुळे सर्व विद्यार्थी व पालकांना हा कार्यक्रम पाहता आला .