२ कोटी २७ लाख रूपयांच्या विकास निधीचे जि.प.उपाध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपुजन….
माजी मंञी निलंगेकर यांच्या माध्यमातून गटाला भरीव निधी
निलंगा,-(प्रशांत साळुंके)-
अंबुलगा बु जि.प.गटातील अंबुलगा बु केदारपूर काटेजवळगा येथे जि.प.उपाध्यक्ष यांच्या हस्ते २ कोटी २७ लक्ष विकास निधीचे भूमीपुजन करण्यात आले असून तात्काळ कामे सुरू करण्यात आले आहेत.
निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु जि.प.गटातून निवडून आलेल्या जि.प.सदस्य तथा विद्यमान जि.प.उपाध्यक्षा सौ.भारतबाई सोळुंके यांच्या जिल्हा परिषद निधीतून अंबुलगा येथील जि.प.शाळेत २८ लक्ष सांस्कृतिक सभागृह व १४ लक्ष शाळा दुरूस्ती व ८ लक्ष एक खोली बांधकाम असे एकूण ५० लक्ष रूपयांच्या विकास निधीचे भूमीपुजन करण्यात आले आहे.तर त्याच गटातील काटेजवळगा व केदारपूर येथे केदारपूर ते हानुमान पाटी ४० लक्ष रूपयांचा दोन किलोमीटर रस्ता व केदारपूर येथील जि.प.शाळेच्या १४ लक्ष रूपयांच्या नवीन दोन खोल्या बांधकाम करण्यात येणार आहेत.तर तेथेच १५ लक्ष रूपये निधीतून जल जीवन मिशन पाणीपुरवठा कामाचे भूमीपुजन केले आहे.तसेच काटेजवळगा येथे मुस्लिम दफनभूमीला संरक्षण भिंत ४ लक्ष अशा अंबुलगा जि.प.गटातील १ कोटी २८ लक्ष रूपये तर तळीखेड येथे १७ लक्ष रूपये तीन नवीन शाळा खोल्या आणि १० लक्ष रूपयांची नवीन ग्रामपंचायत इमारत व दलित वस्ती मधील ८ लक्ष रूपये निधीचे नवीन समाज मंदीर होणार आहे.आणि जाजणूर ते आंबुलगा बु रस्ता एसआरफ ४० लक्ष आणि आंबेवाडी येथे १४ लक्ष रूपये विकास निधीतून तीन शाळा बांधकाम तर जि.प.पंधरा वित्त अयोगातून १० लक्ष रूपये निधीतून पाण्याची नवीन टाकी असे एकून २ कोटी २७ लक्ष रूपये विकास निधी कामाचे जि.प.गटातील गावात विकास भूमीपुजन करण्यात आले आहे.

गावाचा कायापालट
माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर माजी खा.रूपाताई पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या दुरदृष्टी नेतृत्वातून अंबुलगा बु जि.प.गटात अनेक योजनेचा निधी आला असून या गटातील १९ गावामध्ये भरपूर विकास निधी आल्याने अनेक गावांचा कायापालट झाला आहे.
यावेळी चेअरमन दगडू सोळुंके,सरपंच कालीदास रेड्डी,माजी प.स.सदस्य कुमार पाटील,विलास पाटील,सरपंच सुभाष शिंदे,उपसरपंच वामन कांबळे,माधव पाटील,गुंडेराव बिरादार,विलास पाटील,शिवशंकर मिरगाळे,चक्रधर बिरादार,नामदेव हल्लाळे सरपंच गोविंद सुर्यवंशी मनोज पाटील,अरविंद पाटील जाजणूरकर,प्रकाश पाटील,अण्णाराव जाधव,सरपंच ज्ञानेश्वर मोरे यांच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते.