विकास निधी रोखणार्या पालकमंञ्याला निलंगा शहरात यायचा अधिकार नाही- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
निलंगा शहरातील बारा विकासकामांचा लोकार्पण सोहळा
निलंगा,-( प्रतिनिधी)-निलंगा शहराच्या विकासाचा निधी रोखणार्या पालकमंञ्याला निलंग्यात यायचा अधिकार नाही असा आरोप करत माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पालकमंञी अमित विलासराव देशमुख यांच्यावर टिकास्ञ सोडले.
याप्रसंगी प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर आणि लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ श्रीकांत शिंगाडे,जि.प.उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके,संघटन सरचिटणीस संजय दोरवे,मनोज कोळ्ळे,शेषराव ममाळे,अँड.विरभद्र स्वामी,चैअरमन दगडू सोळुंके,कार्यकारी अधिकारी सुंदर बोंदर,पंचायत समिती सभापती राधाबाई बिराजदार,प्रल्हाद बाहेती,माहिती लालासाहेब देशमुख,अंकुश ढेरे आदी जणांची उपस्थिती होती.
या लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोलताना म्हणाले,आधी लातूरला रोज पाणी द्या..मगच निलंग्याच्या विकासावर बोला..गेल्या अनेक वर्षापासून डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विकासाचा पुरा आपण स्वत: गेल्या वीस वर्षांपासून पुढे नेत असून निलंगा येथे येऊन विकास कामाबद्दल बोलणार्यांनी आधी लातूरला रोज पाणी द्यावे मगच निलंगा येथील विकासावर बोलावे असा टोला मारला आहे.निलंगा येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर बोलताना म्हणाले,डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृृतिक सभागृृह उभारण्यात आल्यामुळे कुठलाही राजकीय कार्यक्रम होणार नाही तर निलंग्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी या सभागृहाच्या माध्यमातून सांस्कृृतिक सामाजिक आणि वैचारिक कार्यक्रम घेऊन मुलांच्या भविष्यातील जडणघडण करण्यासाठी मोलाचे कार्य या सभागृृृृहातून करण्यात येणार आहे जिथल्या देशाचे सांस्कृतिक कल्चर चांगला आहे तोच देश आज सुधारीत असून ज्यांनी संस्कृृृती जपली नाही ते आज देश विकण्यासाठी काढत आहेत म्हणून सांस्कृतिक वारसा जपणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे याच निलंगा मधून वंदे मातरम या कार्यक्रमापासून आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात झाली असून याप्रसंगी मी भाषणासाठी उभे राहिलो असता ‘ अर्धा मिनिट ही बोलू शकलो नाही अशा जुन्या आठवणींना माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उजाळा देत जीवनामध्ये चढ-उतार येतच असतात परंतु अडचणीच्या काळामध्ये जी माणसं आपल्या सोबत राहिली अशा माणसांना आपण कधीही विसरलेले नाही डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी दूरदृष्टी ठेवून शंभर कि.मी.अंतरावरून निलंगा शहरासाठी पाणीपुरवठ्याची योजना आणली होती.परंतु तीच योजना पुनर्जीवित करून निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून निलंगा शहरासाठी 24 तास पाणी उपलब्ध करून दिलेले आहे निलंगा तालुक्याच्या दळणवळणासाठी लातूर-जहीराबाद हा राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 752) आपण आपल्या प्रयत्नातून पूर्ण केला असून आता पुठील व्हिजन रेल्वेमंञी पियुष गोयल यांना निलंग्यात बोलावून त्यावेळी आपण निलंगा तालुक्यातून रेल्वे मार्ग करण्याची मागणी केली होती व प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने या रेल्वेमार्गासाठी 50 लाखांचे टोकन ही केंद्र शासनाकडून मिळाले असल्याचे याप्रसंगी सांगितले.निलंगा मार्गे नव्याने रेल्वे सुरू करण्याचे आपले उद्दिष्ट असून ते आपण पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.निलंग्याचा विकास हाच आपला एकमेव ध्यास असल्याचे माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यावेळी सांगितले.
माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर…
निलंगा येथील लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून निळकंठेश्वर भक्ती निवास लोकार्पण माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते झाले.त्यानंतर बालाजी मंदिर सभागृृह,डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सांस्कृृतिक सभागृृह { टाऊन हाॅल } प्रार्थना सभागृृह { शादीखाना } पिरपाशा दर्गाह येथील सभागृृह,योग केंद्र नगरपरिषद निलंगा,सार्वजनिक वाचनालय,विश्वकर्मा मंदिर सभागृह पांचाळ काॅलनी,संत तुकाराम महाराज मंदिर सभागृह,नाला सौंदर्यकरण अटल वाॅक वे,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृृती पुतळा भूमिपूजन,लक्ष्मी मंदिर सभागृृृह,माळी गल्ली,अशोकनगर येथे सभामंडप व परिसर विकास भूमिपूजन,याप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे,बांधकाम सभापती इरफान सय्यद,पाणीपुरवठा सभापती इशरत सौदागर,दिवाबत्ती स्वच्छता सभापती आशा माळी,महिला बालकल्याण सभापती संपता नाटकर,रेखाताई सुरवसे,शरद पेठकर,विष्णू ढेरे,प्रदीप पाटील,भगवान कांबळे,पद्मावती पोतदार,स्मिता देशपांडे,कौशाबाई नागदे,सुमन हाडोळे,सविता उजळे,महमद खाँ पठाण,विकास नाईकवाडे,डाॅ.किरण बाहेती,शंकरअप्पा भुरके,कार्यकारी अधिकारी सुंदर बोंदर,अभियंता कैलास वारद आदी उपस्थित होते.
———————————————————————