36.9 C
Pune
Saturday, May 3, 2025
Homeराजकीय*विकासाचे दृष्टी असलेल्या उमेदवाराना विजयी करून विरोधकांचे डिपाॕझिट जप्त करा-प्रदेश सचिव अरविंद...

*विकासाचे दृष्टी असलेल्या उमेदवाराना विजयी करून विरोधकांचे डिपाॕझिट जप्त करा-प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर*

निलंगा-(प्रशांत साळुंके)-

मारूती रायाच्या चरणी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ
निलंगा व औराद शाहजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा माकणी थोर येथील मारूती रायाच्या चरणी नारळ वाढवून शुभारंभ करण्यात यावेळी बोलताना भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवारवाराना विजयी करून विरोधकांचे डिपाॕझिट जप्त करा असे आव्हान त्यानी यावेळी केले आहे.


यावेळी व्यासपीठावर भाजपा तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे,शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधीर पाटील,शिवसेना तालुकाप्रमुख भगवान जाधव,संजय दोरवे,मधूकर माकणीकर,मिलिंद लातूरे,गुंडेराव जाधव,नरसिंग बिराजदार,तानाजी बिराजदार,चेअरमन दगडू सोळुंके,लाला देशमुख,तुकाराम उर्फ जनार्धन सोमवंशी,राजा पाटील,रोहित पाटील,अरविंद पाटील जाजनुरकर,दयानंद मुळे,अनिल कामले,संतोष बरमदे,राम काळगे,वाघजी पाटील,योगेश चिंचनसुरे,उल्हास सुर्यवंशी अदि उपस्थित होते.


पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले, मतदार संपर्काच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून तिसऱ्या फेरीत जाज्वल्ये देवस्थान माकणीच्या मारूती रायाला नारळ वाढवून अक्षय तृतीयाच्या शुभ मुहर्तावर निलंगा आणि औराद शाहजनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराचा शुभारंभ करत असल्याचे निलंगेकर यानी घोषणा केली.तसेच विरोधकांचे पॕनल कर्तव्यशुन्य,विकासशुन्य असून विस्वासाने विकासाची दृष्टी असलेले पॕनल हे भारतीय जणता पार्टीचे आहे.बाजार समिती निवडणूकीत गुलाल आपलाच आहे.

निलंगा औराद शाहजानी येथील बाजार समितीच्या पॕनलमध्ये सर्व जाती धर्माचे उमेदवार आहेत.शेतकरी कष्टकरी वर्गातील उमेदवाराना आपण संधी दिली आहे.विरोधकाकडे विकासाचे मुद्दे नाहीत.बाजार समिती निवडणूकीत विरोधकांचे डिपाॕझिट जप्त करून त्याना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विस्वास उपस्थित मतदाराना अरविंद पाटील निलंगेकर यानी दिला.
माकणी थोर येथील मारूती रायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळी उर्जा मिळते म्हणूनच प्रत्येक निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ मारूती रायाच्या चरणी नारळ वाढवून करतो असे शेवटी त्यानी सांगितले.माकणी थोर येथील या प्रचार सभेला निलंगा व औराद शाहजानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]