24.9 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeशैक्षणिकविकसित अर्थव्यवस्था ,सक्षम संरक्षण यंत्रणा जबाबदार नागरिक हे भारतीय आर्थिक महासत्तेचे ...

विकसित अर्थव्यवस्था ,सक्षम संरक्षण यंत्रणा जबाबदार नागरिक हे भारतीय आर्थिक महासत्तेचे आधारस्तंभ

.डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे प्रतिपादन

लातूर दि. ११.

लातूर शहरातील दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद विधी महाविद्यालयात दिनांक 9 एप्रिल 2022 या रोजी भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष तसेच दयानंद विधी महाविद्यालयाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त आयोजित आर्थिक महाशक्ती बनने के लिए भारत के सामने की चुनोती  एवम अवसर या विषयावर राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले. त्यावेळीं
      प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार डॉ.सुब्रमण्यम स्वामी  यांनी येथे बोलताना व्यक्त केले

पुढें बोलताना डॉ स्वामी म्हणाले की  भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यामध्ये तीन महत्त्वपूर्ण आधारस्तंभ यांची सखोल अशी चर्चा केली त्यामध्ये विकसित अर्थव्यवस्था, सक्षम संरक्षण यंत्रणा आणि जबाबदार नागरिक यांचे महत्व अधोरेखित केले  


तसेच त्यांनी भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी किमान दहा वर्ष तरी दहा टक्के सरासरी सखल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपी असायला हवे आणि  त्यामध्ये टप्याटप्याने वाढ व्हावी,  तसेच भारतीय अर्थव्यवस्था कार्यक्षम होण्यासाठी  गुंतवणूक देखील महत्त्वाचे आहेअसे आपले मत विशद केले.

  या वेबिनारच्या  अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी यांनी विधी महाविद्यालयातून कायद्याचे अभ्यासक विद्यार्थी म्हणून कशा प्रकारे समाजात कायदा आणि सुव्यवस्था आणि मानवी अधिकारांचे संरक्षण करत आहेत , या महाविद्यालयाने  नेहमीच देशाचे सुजाण स्व विवेकी कुशल राष्ट्रवादी नेतृत्व घडविले आहे यावर आपले मत व्यक्त केले.

या राष्ट्रीय वेबिनारचे उदघाटक महणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे उपस्थित होते तसेच शिक्षण संस्थेचे सचिव श्री रमेश बियाणी , सहायक सचिव श्रीकांत  उटगे, कोषाध्यक्ष  संजय बोरा , क्रीडा समितीचे चेअरमन अँड आशिष बाजपाई , सुदर्शन भांगडिया, सदस्य तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. पुनम नाथानी, संस्थेतील इतर महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, समन्वयक डॉक्टर प्रमोद शिंदे ,विद्यार्थी संयोजक धनंजय सूर्यवंशी आणि महाविद्यालयातील इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची बहुसंख्य प्रमाणात उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]