४६विद्यार्थ्यांनी घेतले ९० टक्यापेक्षा जास्त गुण
लातूर ; दि. १८ ( प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत( दहावी) मार्च २०२२ चा निकाल जाहीर झाला असून वाले इंग्लिश स्कूलने शंभर टक्के निकालासह नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.
या यशाबद्दल संस्थाचालक व प्राचार्य चंद्रशेखर भोगडे यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.
दहावीच्या परीक्षेत वाले इंग्लिश स्कूलचे एकूण ११६ विद्यार्थ्यांपैकी निकिता गाडेकर व श्रीनिवास घवले यांनी शंभर टक्के गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक मिळविला आहे ; तसेच ४६ विद्यार्थ्यांनी ९०टक्के पेक्षा जास्त गुणांसह आणि ४८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश संपादन केले आहे तसेच २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद सोनवणे , सचिव मकरंद सावे, प्राचार्य चंद्रशेखर भोगडे यांच्यासह शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.