रसिक श्रोत्यांना पडलेले एक सोनेरी स्वप्न…❤️
आशा भोसले म्हणजे चिरतरुण , सदाबहार आवाजाचे चांदणे , आपल्या स्वरांच्या ओंजळीतून मोती उधळणाऱ्या आशाताई 8 सप्टेंबरला वयाची 88 वर्षे पूर्ण करत आहेत..
अनेक दु:खाचे घोट पचवून,सतत आनंदी राहून, इतकी वर्षें आपला ठसा उमटवंत राहणं ही काही खायची गोष्ट नाही हो…
फिनिक्स पक्षाप्रमाणे, राखेतून पुन्हा जन्म घेईन मी..
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी..
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे…
ही सगळी गाणी जणू काही आशाताईंसाठीच असावीत..
मला त्यांना फोटोत बघितले तरी प्रसन्न वाटते..
जीवन गाणे गातच रहावे..
झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे….
याची पुनश्च प्रचिती येते..
आपल्या मनाप्रमाणे संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या आशाताईंना दु:खाची झळ आता नं लागो..
वार्धक्य त्यांच्यापासून कोसो दूर राहो..
बसं एवढेच कर परमेश्वरा 🙏
सुरेश भटांची आशाताईंना समर्पित एक नितांत सुंदर कविता…….🌹
तारुण्य तुझ्या हृदयाचे हें असेच बहरत राहो !
वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो !
आता न तुझे कुठल्याही जखमेशी देणेघेणे !
पाऊस तुझ्यावर सा-या सौख्यांचा बरसत राहो !
हा कंठ तुझा अलबेला ! हा रंग तुझा मतवाला !
तलवार तुझ्या गाण्याची बिजलीसम चमकत राहो !
तू सरगम सुखदुःखांचा जपलास कसा ? उमजेना,
तो कैफ तुझा माझ्याही धमन्यांतुन उसळत राहो !
तुज बघून हटल्या मागे आलेल्या वादळलाटा….
सुखरूप तुझ्या गीतांचे…. गझलांचे गलबत राहो !
तू अमृतमय मद्याचा खळखळता अक्षय प्याला !
एकेक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवत राहो !
ही सांज न आयुष्याची ! आताच उजाडत आहे…
चंद्राला उमगून गेले ! सूर्याला समजत राहो !
❤️ उदंड निरामय आयुष्यासाठी खूप शुभेच्छा ❤️
जयंती देशमुख