18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयवाढदिवसाला झालेली गर्दी हिच आप्‍पांनी कमवलेली खरी संपत्ती ...!

वाढदिवसाला झालेली गर्दी हिच आप्‍पांनी कमवलेली खरी संपत्ती …!

भारतीय जनता पार्टीचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेब यांचा जन्मदिवस नुकताच मोठया उत्‍साहात साजरा करण्यात आला. रेणापूर तालुक्यातील गावागावात कार्यकर्त्यांनी विविध मंदिरात अभिषेक व महापूजा करून अप्पासाहेबांच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना त्‍याचबरोबर रेणापूर येथे झालेला पेढे तुला आणि वाढदिवसाच्‍या निमित्ताने संवाद संपर्क कार्यालयात झालेली प्रचंड गर्दी पाहता आ. रमेशअप्पा कराड यांनी आपल्या आयुष्यात कार्यकर्त्‍यांच्‍या माध्‍यमातून कमावलेल्या संपत्तीची भव्यता  दिसून आली. 

रेणापूर तालुका हा लोकनेते स्‍व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा मतदारसंघ. मुंडेसाहेब मोठे लोकनेते झाले ते याच मतदार संघातून. साहेबांना तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलं ते याच मतदारसंघाने आणि जीवापाड प्रेम केलं ते याच तत्‍कालीन रेणापूर विधानसभा मतदार संघाने. मतदार संघाच्‍या पुर्नरचनेत लातूर ग्रामीण मतदार संघाची निर्मिती झाली. या लातूर ग्रामीण मतदार संघात रेणापूर तालुक्‍याचा समावेश करून कमळ वाढलं तिथेच कमळ संपवण्याचा घाट घातला आणि प्रस्थापित काँग्रेस वाल्यांनी या मतदार संघातील मतदारांना हुकूमशाही  दंडमशाही वागणूक दिली. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच यांचे तत्त्व आहे. 

 मुंडे साहेब यांचे निधनानंतर 2014 सालीपासून लातूर ग्रामीण मधील जनतेला आमदार काय असतो हेच माहिती नव्हते. या मतदार संघात आत्तापर्यंत आपण मत ज्याला दिल जे निवडूण आले त्यांना भेटायला गेल्यास  त्यांची भेट होणं हेच नशीब. मात्र वेळोवेळी रमेशआप्पा कराड साहेबांनी रस्‍त्‍यावर उतरून प्रस्थापितांविरोधात सतत संघर्ष केला आणि त्याच संघर्षाच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर गोरगरींब सर्वसामान्‍यांना दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला. 

श्रीमंत गरिब  न पाहता, उच्च-नीच न पाहता, कुठल्या जाती पातीचा न विचार करता प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नागरिकाला न्याय दिला. आ. रमेशअप्‍पा कराड साहेबांनी केलेल्‍या कामाची दखल घेवून भारतीय जनता पार्टीच्‍या नेतृत्‍वाने त्‍यांना आमदार केले ज्यावेळेस आमदारकी भेटली त्यावेळेस अनेकांना असं वाटलं की रमेशआप्पा कराड साहेब बदलतील पण बदलतील ते रमेशअप्पा कसले. 

     लातूर ग्रामीण पुरतं मर्यादित असणारे आप्पा आता पूर्ण जिल्हाभर कार्य करू लागले. विस्तार वाढला प्रत्येक कार्यकर्त्याला अडचणीच्या काळात अप्पासाहेबांनी मदत केली. कोरोनाच्या काळात अनेकांना मदतीचा हात दिला. एवढच नव्हे तर कधीही कुठलाही कार्यकर्ता भेटायला आला असता त्‍यास आप्‍पा भेटतच असतात. रात्री उशिरापर्यंत पर्यंत अप्पासाहेब येणा-यांना भेटतच असतात मग कितीही उशीर झाला तरी चालेल.

 मोठया प्रमाणामध्ये वेगवेगळया माध्‍यमातून जनतेची सेवा करणारा आमदार भेटणं हेच लातूर ग्रामीणचच नव्हे तर लातूर जिल्ह्याच नशीब आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यानंतर लातूर जिल्ह्याने खरा लोकनेता पाहिला असेल तर तो रमेशअप्पा कराड साहेब यांच्या माध्यमातून. हजारोंच्या संख्येने अप्पासाहेबांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी येणारी गर्दी हीच सांगते की आप्पासाहेब आपण लोकनेते आहात आणि लोकनेतेचा खरा वारसा आपण चालवत आहात. 

आप्पासाहेब हे स्पष्ट वक्ते आहेत. खोट बोलत नाहीत ते कुणाला लबाडी करत नाहीत भ्रष्टाचारी नाहीत  चारित्र्यसंपन्न असं नेतृत्व आहे आणि म्हणूनच भविष्यामध्ये लातूर जिल्‍हयाचेच नव्‍हे तर मराठवाड्याचे नेतृत्व करावे हेच वाढदिवशी सर्व जिल्ह्यातील जनतेला दिसले असा लोकनेता आम्हाला लाभला हेच आमचे भाग्य आहे

       

    अँड दशरथ सरवदे

       तालुकाध्यक्ष

  भाजपा रेणापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]