वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
538

#जन्मदिन 

 

व्यक्तीस लाभलेले नाव व कर्तृत्व यांची जोड ही दुर्मिळ असते. परंतु आपल्या स्वभावगुण, कर्तृत्व, निर्णयक्षमता यातून पदोपदी लाभलेल्या नावास सार्थ करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री शैलेश भैय्या. शैलेश या शब्दाचा अर्थ होतो पर्वतांत श्रेष्ठ – पर्वतांचा देव.

अगदी तसेच पर्वतप्राय व्यक्तित्व म्हणजे भैय्या. दातृत्वाचा – दानशूरतेचा शिखर, सोबत्यांच्या पाठीशी राहणारा दृढ – अचल पाठीराखा, इतरांना शिखर उंची वर नेऊन ओळख देणारा हिमालय, आपल्या सोबत्यांची रक्षा करणारा असे आपल्या नावास सार्थ करणारे असंख्य स्वभावगुण आदरणीय भैय्यांचा सहवास लाभलेल्या प्रत्येकाने जवळून अनुभवत त्यांना प्रेमाने ‘राजा’ बनवितात.

असे पर्वतप्राय प्रेरक आश्वासक बंधुतुल्य नेतृत्व गॉडब्रदर श्रीमान शैलेशभैय्या लाहोटी यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा !

दातृत्व हाच धर्म दानशूर हीच ओळख कायम ठेवत लाहोटी परिवाराचा दातृत्वाचा वारसा समर्थपणे चालवीत पक्ष, जात, पंथ, धर्म आदी पेक्षा वर जाऊन येणाऱ्या प्रत्येकास आनंदाने मदतीचा, प्रेमाचा हात पुढे करत आपल्या दिलखुलास स्वभावाची प्रचिती करून देणारे, आपल्या जिव्हाळ्याने सामन्यास असामान्य बनविणारे व्यक्तीमत्व म्हणजे श्री शैलेश भैय्या लाहोटी जी.

परिसस्पर्श देणारे भैय्यांचे व्यक्तिमत्त्व जीवनास सुवर्ण तेज देते. अबालवृद्धांमध्ये प्रिय, जेव्हा जेव्हा लहान मूल समोर येतं तेव्हा पटकन त्याच्या पेक्षा लहान होऊन त्याचा उत्साह द्विगुणित करणारे भैय्यांचे मन हे विद्यार्थी प्रिय ठरविते. सतत एखाद्याला मोठे करण्याचा ध्यास, काहीतरी देण्याचा ध्यास त्यांना उत्तुंग ठरविते.

‘कार्यकर्ता’ या पदाला सर्वात मोठे महत्त्व देत राजकीय बाजू समर्थपणे पेलताना परिवर्तनाची नांदी आपल्या महानगरपालिकेपर्यंत पोचवण्यात #शहरजिल्हाध्यक्ष म्हणून बजावलेली यशस्वी भूमिका ही सदैव स्मरणात राहील.

प्रवीण शिवणगिकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here