16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeलेख*‘‘वकृत्व, दातृत्व आणि संघर्षशील नेतृत्व’’*

*‘‘वकृत्व, दातृत्व आणि संघर्षशील नेतृत्व’’*

 वाढदिवस विशेष

जातीपातीने कोणाचेही भले झाले नाही, “वसुधैव कुटुंबकम्” यानूसार कोणतीही जात किंवा धर्म माणूसकी पेक्षा मोठा नाही याची जाणीव कायम ठेवून मतदारसंघ माझे कुटुंब या भावनेतून काबाड कष्ट करणार्‍या शेतकरी, शेतमजूरांच्या घामाचे मोल झाले पाहिजे; सर्व सामान्यांना, गोरगरीबांना त्यांचा न्यायहक्क मिळाला पाहिजे यासाठी आवाज उठवून सतत संघर्ष करणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड हे जनसामान्यांच्या मनातील संघर्षशील नेते निर्माण झाले आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठीने दिलेल्या आमदारकीचा उपयोग गोरगरीब सर्व सामान्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्यासाठी प्राधान्याने केला. अठरा पगड जाती धर्मांना सोबत घेवून प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करणारे आ. रमेशअप्पा कराड यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडीवस्तीत विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी मिळवून दिला सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी निर्माण करुन मानसन्मान मिळवून दिला अशा या अष्टपैलू संघर्षशील नेतृत्वाचा आज जन्मदिवस. राजकिय, सामाजिक आणि आध्यातिमक कार्य त्यांच्या हातून यापुढील काळातही होत राहील हीच यानिमित्ताने सदिच्छा !!!…… चंद्रकांत कातळे, रेणापूर.

            जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या या भारत देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. येत्या काळात शतकही साजरे होईल, मात्र एवढ्या वर्षातही देशातील जातीयतेचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही देशवासीयांची शोकांतीका म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. आज जग झपाट्याने आधुनीक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने धावत असताना आपण जातीपातीच्या बंधनात अडकुण पडणे ही प्रगती नव्हेतर अधोगती आहे, असेच म्हणावे लागेल. जातीपातीने कोणाचेही भले झाले नाही. कोणतीही जात किंवा धर्म माणुसकीपेक्षा मोठा नाही. या सुत्रानूसार गोरगरीब सर्व सामान्य जनतेसाठी, शेतकरी, शेतमजूर, दिन दुबळ्यांसह कष्टकर्‍यांसाठी विविध प्रश्नावर लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी संघर्ष केला. स्व. मुंडे साहेब यांची काम करण्याची पद्धत सर्व सामान्यांसाठी संघर्ष करण्याची धमक आणि ग्रामीण जनतेशी कायम ठेवलेली नाळ, या कामावर प्रभावित होऊन त्यांच्या संघर्षाचा वारसा घेवून आ. रमेशअप्पा कराड यांनी भारतीय जनता पक्षाचे काम सुरु केले. 

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी रमेशअप्पा कराड यांच्यावर दिली. लातूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्‍हणून ओळखला जातो. या भागात भाजपाचे काम करणे तसे अवघडच होते, मात्र जिद्दीने जोमाने जिवाभाचे कार्यकर्ते निर्माण करुन त्यांच्या सुख दु:खात सहभागी होऊन प्रस्थापित शक्ति विरुद्ध सतत संघर्ष करत त्‍यांनी भाजपाचे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. लातूर ग्रामीण या मतदार संघात मेहनतीने कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करुन भाजपाचा बालेकिल्ला निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आ. रमेशअप्पा यांची जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी अनेकवेळा अनुभवायला मिळाली.  

काबाड कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांना, शेतमजूरांना कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांच्या घामाचे मोल झाले पाहिजे गोरगरीब सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी सोयाबीन अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई, पिकविमा, दुष्काळी मदत वेळोवेळी विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, मेळावा घेवून सरकारला धारेवर धरुन संघर्ष केला आणि न्याय हक्क पदरात पाडून घेतला. मांजरा कारखान्याच्या दारात परिवाराच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे गाळप केलेल्या ऊसाला भाव मिळावा यासाठी मांजरा कारखान्याच्या दारात आ. रमेशअप्पा कराड यांनी केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना शासनाच्या एफआरपी नूसार भाव मिळाला. 

गेल्या पंधरा-वीस वर्षात आ. रमेशअप्पा कराड यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. पक्षाच्या वतीने दिलेले कार्यक्रम प्रत्येक वेळी यशस्वी केले. मागील काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, रेणापूर नगर पंचायत यासह विविध निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून काँग्रेस पुढार्‍यांना धुळ चारली आणि सामान्य कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे मिळवून दिली. या सर्व कामाची दखल घेवून भाजपा पक्षश्रेष्ठीने रमेशअप्‍पा कराड यांना विधानभवनात काम करण्याची संधी दिली. रमेशअप्‍पा आमदार व्‍हावेत ही गोरगरीब, सर्व सामान्‍यांची इच्‍छा यानिमित्‍ताने पूर्ण झाली. प्रत्‍येकाला आपल्‍या हक्‍काचा माणूस आमदार झाला याचा प्रत्‍यय प्रत्‍येकाला अनुभवायास मिळाला. आमदार झाले म्‍हणून आप्पांमध्ये कुठलाच बदल झाला नाही, बडे जावपणा दिसला नाही. सर्वांना सहजतेने उपलब्‍ध होणारे आप्‍पा, खरोखर हक्‍काचा आमदार रमेशअप्‍पाच्‍या रूपाने सर्वसामान्‍यांना  मिळाला आहे.

           केंद्रशासन आणि राज्‍यशासन यांच्‍याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात, वाडीवस्तीतील विविध गावच्‍या  विकासासाठी कोटयावधी रूपयाचा निधी मंजूर करून आणला. या निधीतून गावागावात अंतर्गत रस्त्यांची कामे, नाली बांधकाम, जल-जीवन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, सभागृह, समाजमंदिर, सभागृह, विविध गावातील धार्मिक स्थळांच्या विकास योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्मशानभूमी शेड, नदी नाल्यावर पुलांचे बांधकाम, शेतरस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते, कंपाऊंड वॉल, शादीखाना यासह अनेक कामांना मंजूरी मिळवून घेतली. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत हे खुप दिलासादायक आहे. मतदार संघातील गावागावात, वाडीवस्तीत आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातून विविध मंदिरासमोर बांधण्यात आलेले सभागृह गावकर्‍यांना लक्षवेधी ठरत आहेत. येत्‍या काळात निश्चितपणे आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या हातून विधायक कामे होतील यात शंकाच नाही. कोरोनाच्या संकट काळात आ. रमेशअप्‍पा कराड यांनी अनेक रुग्णांना मोठा दिलासा दिला, गरजूंना तात्‍काळ वैद्यकीय सुविधा पुरविली. लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयास सुसज्‍ज रूग्‍णवाहिका दिल्‍या. मतदार संघातील आशा सेविकांसह विविध कोरोना योध्‍दांना वेळोवेळी सन्‍मान करून प्रोत्‍साहन दिले. एकुणच कोरोना काळात आ. कराड यांनी केलेले काम कोणीही कधीही विसरु शकत नाही.

            लातूर ग्रामीण मतदारसंघ हेच माझे कुटुंब या भावनेतून काम करत असताना रमेशअप्पांनी शासनाचा विकास निधी मिळवूण देताना, जनहिताच्या विकासाच्या योजना मंजूर करताना गावागावात, वाडीवस्तीत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. वैयक्तिक लाभाच्या योजना संपूर्ण मतदार संघात मोठ्या प्रमाणात गरजु लाभार्थ्‍यांना मिळवूण दिल्या, ज्याला ज्याला गरज आहे, जो गरजवंत आहे आणि ज्याच्यासाठी योजना आहे अशांना शासनाच्या योजनांचा लाभ देवून मोठी मदत केली आहे. या सर्व योजना राबवत असताना जात, धर्म, पंथ, गटतट असा भेदभाव केला नाही यातून “वसुधैव कुटुंबकम्” याचा प्रत्यय दिसून आला.   

आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे, गोरगरीब सर्व सामान्यांच्या हितासाठी संघर्ष करणारे, गरजुंना वेळोवेळी मदत करणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यश आले म्हणून कधीच उन्मत झाले नाहीत तर अपयश आल्‍याने कधीच खचून गेले नाहीत. गोरगरीब जनतेला, अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे हे तर रमेशअप्पांच्या आवडीची कामे आहेत. अनेकांना शिक्षण, आरोग्‍य, क्रिडा, उद्योग व्यवसायासाठी मदत करून आधार दिला. मदत करताना कोण कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे. याचा किंचीतही विचार न करता स्वत:च्या खिश्यातून अनेकांना मदत करणारे आ. रमेशअप्पा कराड हे खरोखरच आधारवड आहेत. राजकारण आणि त्‍यातून मिळालेली पदे स्‍वताःसाठी नव्‍हे तर समाजाला उभे करण्‍यासाठी, अडचणीत, संकटात सापडलेल्‍यांना मदत करण्‍यासाठी आहेत. याची जाण आणि भान ठेवून राजकारण समाज संपन्‍नतेसाठीच आहे हे तत्‍व अंगीकारून भाजपाचे नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांनी समाजसेवेचे ओझे अखंडपणे वाहून नेत आहेत. येत्‍या काळात आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात उतुंग भरारी घेवून अनेकांच्‍या  डोळ्यातील अश्रू पुसण्‍याचे काम करतील यात शंका नाही.

     लेखन:  चंद्रकांत सुर्यकांत कातळे

                       भाजपा लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]