नांदगावच्या तरुणांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
लातूर – लातूर तालुक्यातील नांदगाव येथील काही तरुणांनी ‘श्रमदानातून ग्रामविकास’ या टिमच्या माध्यमातून एकत्र येत गावातील एका निराधार मातेला लोकसहभागातून घर बांधून देत त्या निराधार मातेला आधार देण्याचे काम केले असून दि. 16 जुलै रोजी या वास्तूचा गृहप्रवेश उद्घाटन कार्यक्रम लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, काँग्रेस पक्षाचे युवा नेते गणेश भैय्या एस आर देशमुख यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक आनंदराव पाटील, ग्रामसेवक सौ. सविता शिंदे, उपसरपंच शिवाजी उदारे, चेअरमन सतिश कुलकर्णी, व्हाईस चेअरमन व्यंकट घोडके उपस्थित होते.
नांदगाव येथील एका निराधार महिलेच्या राहत्या घराची प्रचंड दुरवस्था झाली होती. त्या घराच्या भितींना मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. तसेच घरावरील पत्र्याची मोठी दुरावस्था झालेली होती. घरावरील पत्रे खराब झाल्या मुळे पावसाळ्यात घरावरील पत्र्यावर पडणारे पावसाचे पाणी हे पुर्ण घरात पडायचे यामुळे घरात राहणे सुध्दा कठीण झाले होते. सदरील घटनेची माहिती नांदगाव चे युवा ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील यांना गावातील तरुणांनी दिली व रोहित पाटील यांनी या घराची तात्काळ पाहणी करत व सदरील निराधार मातेला विचारणा करुन घर बांधून देतो असा विश्वास दिला. दि. 12 जून रोजी रोहित पाटील यांनी गावातील तरुणांना एकत्र करत ’एक हात मदतीचा’ हा व्हाट्सऍप ग्रुप तयार केला व या ग्रुप च्या माध्यमातून गावातील तरुणांना साद घातली व या हाकेला ओ देत गावातील तरुणांनी व जेष्ठ नागरिकांनी भरभरून मदत करण्यास सुरुवात केली. या वास्तुचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी गावातील जेष्ठ नागरिक सुभाष झरकर, वामन पोतदार, बापुराव साळुंके, बाबासाहेब जगताप, हेमंत कुलकर्णी, महेबुब पठाण, बब्रुवान गव्हाणे, राजेंद्र साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली या घर बांधनीचे काम सुरू करण्यात आले व ते काम साधारण एक महिन्याच्या आत लोकसहभागातून पुर्ण करत त्या निराधार मातेला आधार देत गावासमोर आदर्श निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न गावातील तरुणांनी केलेला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी गावातील माजी सरपंच महादेव बनसोडे, त्रिंबक ढमाले, सचिन पाटील, हेमंत कुलकर्णी, सिदाजी जगताप, राजाभाऊ माने, अशोक महाजन, दिलीप पाटील, कुंडलिक काळे, काकासाहेब पाटील, अशोक जगताप, बालाजी वाघमारे, भगवान ढमाले, बालाजी महाजन, संतोष साळुंके, गोविंद जाधव, बिरुदादा काळे, बालाजी चिगुरे, भागवत पाटील, गोविंद चिगुरे, ज्ञानेश्वर साळुंके, विकास कांबळे, हसन जाऊन, धीरज पाटील, नितीन रणदिवे, किर्तीमान जगताप, महेश हल्ले, आप्पा सातपुते, सचिन जगताप, शरीफ शेख, निलेश शिंदे, अविनाश शेकडे, सुयश जगताप, कृष्णा पाटील, उध्दव पाटील, वैभव पाटील, यश कुलकर्णी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावित कैलास जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रमदानातून ग्रामविकास या टिम व ग्रामपंचायत कर्मचारी सतिश सातपुते यांनी अथक परिश्रम घेतले.