कोल्हापूर ;दि.२५ ( वृत्तसेवा) -अखिल भारतीय पुरोहित महासंघ भारत राष्ट्र यांच्या वतीने आज कोल्हापूर प्रांत मध्ये राज्यस्तरीय बैठक व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राष्ट्रीय कार्यकारिणी सचिव डॉ लक्ष्मण आर्य तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रभारी पंडित सुयश शिवपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील पदाधिकारी यांच्या सर्वानुमते देशातील सहा राज्यांमध्ये सात लोकसभा निवडणुकीत अखिल भारतीय पुरोहित महासंघाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती ठरविण्यात आली ;तथा तसा ठराव आज झालेल्या बैठकीत सर्वानुमते सहमत करण्यास आला.
या वेळी देशातील ऊत्तर प्रदेश मध्ये दोन जागा बिहार मध्ये एक तेलंगणा मध्ये एक तर पश्चिम बंगाल मध्ये पंडित योगेश आचार्य तथा महाराष्ट्र राज्य मध्ये ज्योतिषाचार्य पंडित अतुल शाश्री भगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सदरील प्रस्ताव राज्य पुरोहित संघाने आज केंद्रीय पुरोहित संघाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला व भाजपा कडुन सात जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रदेश संघटक धनसिंग सूर्यवंशी प्रदेश उपाध्यक्ष संजयजी पिलगे( तुळजापूर ), पंडित प्रदेश महामंत्री अजित पिंपळे गुरुजी ,मेघराज बुणे (कोल्हापूर), प्रांत अध्यक्ष लक्ष्मीकांत पाठक( धुळे ),योगेशजी आर्य, (मुंबई) महामंत्री महादेव शास्त्री बीडकर (कोल्हापूर ) प्रांत सदस्य सह सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

लोकसभा आणि विधानसभेमध्ये पुरोहितांना प्रतिनिधित्व द्यावे, महाराष्ट्रात पुरोहित कल्याणकारी बोर्ड स्थापन करुन बोर्डाला शंभर कोटी रुपये द्यावेत , नोंदणीकृत पुरोहितांना वीस हजार रुपये वेतन द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय पुरोहित महासंघाचे राष्ट्रीय नेते डॉ. पंडित लक्ष्मणजी आर्य यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केली.
महाराष्ट्रात पुरोहित कल्याणकारी बोर्डाची महासंघाची अनेक वर्षाची मागणी असून या महासंघाला शंभर कोटी रुपये भाग भांडवल द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. पुरोहितांना नोंदणीकृत मंदिर, आश्रम, मठ येथे सेवा देणाऱ्यांना किमान वेतन मिळावे. देशात महासंघ शंभर वर्ष कार्यरत असून महाराष्ट्रात पुरोहितांची ११ लाख इतकी संख्या आहे. या सर्व पूरोहितांचे नेतृत्व महासंघ करत आहे. घाटावरील सेवा, मंदिर सेवा, यजमान, घर ,आश्रम येथील सेवा पुरोहित करत आहेत. सरकारने मौलानांना जसे मानधन मिळते तसे नोंदणी मंदिराच्या पुजाऱ्यांना किमान २० हजार रुपये वेतन द्यावे अशी ही मागणी केली.

ग्रामीण भागातील पुरोहितांच्या मुला मुलींच्या शिक्षणाचा खर्च, केजी ते पीजी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकारने उचलावा. तसेच शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्यावे, अशीही मागणी करण्यात आली. जेष्ठ पूरोहितांना मासिक सहा हजार रुपये वेतन देण्यात यावे. महासंघातर्फे राज्यातील सर्व तालुक्यात सर्व जातीय व आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह केंद्र स्थापन करून विवाह संस्कार करतात येणार आहेत .विवाह नोंदणीकृत राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी पुरोहित संघ काम करणार आहे.
पुरोहित महासंघाकडे तक्रारी आल्या असून महाराष्ट्रात विवाह नोंदणीसाठी पूरोहितांची साक्ष, विवाह संस्कार केल्याचे प्रमाण म्हणून आधार कार्ड फोटो व शपथपत्र घेतले जाते. पण अनेक पुरोहित शिक्षण व प्रशिक्षण न घेतलेले लोक सरकारला फसवत आहेत. इथून पुढे विवाह नोंदणी करण्यासाठी सरकारी कागदपत्रे घेण्यासंदर्भात शासन व प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.
पत्रकार परिषदेला सुरेश शिवपुरी, अजय शास्त्री, नरेंद्र शास्त्री, लक्ष्मीकांत पाठक आदी उपस्थित होते.