*लोकमंगल पतसंस्थेची योजना*

0
231

लोकमंगल पतसंस्थेत श्रमिकांसाठी
झिरो बॅलन्स खात्याची सोय

सोलापूर – सोलापूरच्या लोकमंगल सहकारी पतसंस्थेत श्रमिकांसाठी झिरो बॅलन्स खाते उघडण्याची सोय केली जाईल अशी घोषणा लोकमंगल समूहाचे प्रणेते आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी काल सोलापुरात बोलताना केली. पतसंस्थेच्या 47 व्या शाखेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कामगारांची मोठी वस्ती असलेल्या नीलमनगर भागात ही शाखा सुरू करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, नगरसेवक श्रीनिवास करली, नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड, पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका अलका देवडकर आदी उपस्थित होते. शिवाय या भागातले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख यांनी या भागातल्या श्रमिक जनतेने पतसंस्थेच्या बँकिंग सेवेचा लाभ घ्यावा आणि आपले जीवनमान सुधारावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता वाघमोडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here