जयंती विशेष
माजी मुख्यमंत्री व माजी केद्रींय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांची २६ मे रोजी ७७ वी जयंती विविध विधायक उपक्रमाने साजरा होत आहे. लोकशाहीतील लोकनेता हा लोकगंगेच्या प्रवाहातून रूजत, वाढत, विस्तारत जात असतो. एखादया नदी प्रमाणे तो लोकांचे जीवन सुखी, समृध्द आणि संपन्न करतो. आदरणीय विलासराव देशमुख यांचा लोकसेवेला समर्पित नेतृत्वाचा प्रवास असाच झाला आहे. बाभळगावचे सरपंच, लातूरचे आमदार, राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्री, राज्याचे दोनदा मुख्यमंत्री, केंद्रियमंत्री अशी त्यांची वाटचाल राहीली. या काळातील कार्यामूळे त्यांच्या रूपाने लोकशाहीतील नेतृत्वाच एक नव परीमाण निर्माण झाल आहे.
सर्वांगीण विकासाच सुत्र
विलासरावजी देशमुख यांनी आपल्या राजकीस वाटचालीत विविध पदावर काम केले. या कार्यकाळात लातूरसह राज्यातील आणि देशातील लोकांच्या जीवनात परीवर्तन करण्यासाठी अहोरात्र काम केले.सार्वजनीक जीवनात प्रारंभीपासून त्यांच सर्वांगीण विकासाच सुत्र हा विकासमंत्र होता. त्यांच्या विलक्षण नेतृत्वामूळे लातूरकरांनी कात टाकून शिक्षण क्षेत्रातसह सर्वच क्षेत्रात भरारी घेतली. सहकार, कृषी, सिंचन, उदयोग व्यवसाय, मुलभूत सोयीसुविधांच्या विकासातून आर्थिक क्रांती झाली.

नव्या विचारांची पेरणी
लातूर जिल्ह्यात सामाजिक सलोख्याची परंपरा आहे. विविध जातीधर्माची लोक गुण्यागोवीदाने राहतात. अशा सामाजिक वातावरणच, सौहार्दतेची संस्कृती जपली आणि वाढवली. यामूळे येथे उद्योग, व्यवसाय, व्यापारास चालना मिळाली. सर्वसामान्यांनी प्रबोधनाची कास धरली एक विकासाची चळवळ येथे सुरू झाली. सामाजिक प्रबोधनाची आंदोलने याकाळात झाली. माणसाच्या मनातील वाईट रुढी, परंपरा, कर्मठता, देवभाळेपण ही दैववादीवृत्ती नव्या प्रगतीच्या विचारांची पेरणी करून नष्ट केली. आपणही काही केले पाहिजे ही विधायक उर्मी सामान्य लातूरकरात जागवली. यामूळे लातूरची प्रगती सर्व क्षेत्रात होत आहे.

विकासाचा सुवर्णकाळ
लातूर आणि लातूरकरावर विलासरावजीचे अतोनात प्रेम होते. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लातूरचे हीत जोपासले. राजकीय जीवनात काम करतांना जे नव ते लातूरला हव ही ब्रीदच पाळल. यामूळे लातूरमध्ये अनेक योजना मार्गी लागल्या. राजकीय वाटचालीत ज्या खात्याचा पदभार त्यांनी स्विकारला त्या खात्याची योजना लातूरला विकासाच्या पहिला घास म्हणून आणली. सन १९८० ला पहिल्यादा आमदार, १९८२ ला गृहराज्यमंत्री असतांना त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत, पोलीस वसाहत, शहरात तीन नवी पोलीस ठाणे उभी केली. १९८५ ला कॅबिनेट मंत्री झाले शंकरराव चव्हाण मंत्रीमडळात विलासरावाकडे महसुल, सहकार, सार्वजनीक बांधकाम, वाहतुक व संसदिय कामकाज ही खाती होती. या काळात त्यांनी लातूरकारांच्या स्वप्नाची मुहूर्तमेढ मांजरा कारखाना रूपाने उभारली. जिल्हा परिषदची तीन मजली इमारत उभी करून शहरातील ४३ प्रशासकीय कार्यालये एका छताखाली आणले. नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय उभारले, परिवहन खात्याचा मंत्री म्हणून गाव तेथे गाडी योजना राबविली. नंतरच्या काळात कृषी, लाभक्षेत्र विकास, फलोद्यान व पर्यटन विकास ही खाती सांभाळली. यावेळी लातूर येथे कृषी महाविद्यालय व उदगीर येथे पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. कृषी महाविद्यालय, विभागीय कार्यालये लातूरात आणण्यात सिहाचा वाटा विलासरावजींचा होता. लातूरला हे व्यापार व व्यवसायाचे प्रमुख शहर आहे. या शहराला दळणवळणाच्या सोयीसुवीधा उपलब्ध होवून विकासाला गती देण्यासाठी रेल्वे, विमानसेवा व राष्ट्रीय महामार्ग जोडणी यातून लातूर देशातील प्रमुख शहराशी व जगभराशी जोडले.

सहकार आणि साखर उदयोगला चालना
विलासरावजींना शेती, शेतकरी आणि ग्रामिण संस्कृतीचा अभ्यास होता, अभिमान होता. या भागाच्या उन्नतीसाठी सहकार, साखर उद्योग, आधुनिक शेती, कृषी यांत्रीकीकरण विकासासाठी दुरगामी निर्णय घेतले, योजना राबविल्या. सहकार आणि साखर उदयोगासाठी साखर धोरण ठरवल. कारखाना आधुनिकीकरण, उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणीस वित्त सहाय्य, ऊसविकास योजना, साखर आयात-निर्यात धोरण, अतिरीक्त ऊसाचे गाळप, साखर उतारा घट अनूदान, वाहतूक अनूदान, थकहमी, बफरस्टॉक, ऊसशेती यांत्रिकीकरण, विस्तारीकरण व उपपदार्थ प्रक्रीया प्रकल्प उभारणीस सभासदाच्या सक्तीने कपाती न करणे हे त्यांना घेतलेले निर्णय महत्वाचे ठरले आहेत.
कृषीविकासाठी ऐतिहासिक निर्णय
विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाची जडणघडणच ग्रामीण भागातून झाली आहे. त्यांच्यावरचे सर्व संस्कार ग्रामीण संस्कृती, शेतीमाती या कुशीतले झाले. यामुळे शेती, सहकार, ग्रामविकास, ग्रामीण भागातील जनजीवन हे त्यांच्या जिव्हाळयाचे विषय होते. सरपंच पदापासून मुख्यमंत्री, केंद्रियमंत्रीपदावर काम करतांना या विषयाला त्यांनी न्याय दिला. यामुळे विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ हा सर्व दृष्टीने शेतकऱ्यासाठी सुवर्णकाळ होता. राज्यातील शेतकऱ्यासाठी मंत्रालय कृषीपंढरीच ठरली होती. त्यांनी शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय कृषीविकासाठी घेतले. यामध्ये सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २१ टीएमसी पाणी मंजूरी, कर्जमाफी, शुन्य टक्के व्याजदराने कर्ज, कृषी यांत्रीकीकरणास अनुदान, जैवतंत्रज्ञान धारेण, साखर धोरण, ऊसविकास योजना, इथेनॉल धोरण, अपारंपारीक ऊर्जा धोरण,आजारी साखर कारखान्याना मदत,कृषी प्रक्रीया ऊदयोगाला चालना, कृषी संशोधन संस्थाना भरीव मदत, बाजार समिती अदययावत करणे, कृषी माल तारण योजना, शेती स्वावलंबन मिशन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र यासरख्या अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले योजना राबविल्या या योजना कृषीविकासाला दिशा देणाऱ्या आहेत.
कर्तबगार मुख्यमंत्री
विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचे सर्वांधिक काळ आघाडी सरकार चालविले.या सरकारच्या माध्यमातून विशेषता बहूजनासाठी कार्य केले. राजकीय, सामाजिक, कृषी, आर्थिक, संस्थात्मक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा दाखविणारे आहे. मराठवाडयाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २१ टीएमसी पाणी मंजूर करणे, आशिया खंडातील पहिल्या मोनोरेल सेवेस मंजूरी, माहिती अधिकार, मराठवाडा विकासनिधी, महिला बचत गटाना अल्प व्याजाने कर्ज, सामाजिक विकास समन्वय कक्ष, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रात अश्वारूढ पुतळा उभारणी, खेळाडूना आरक्षण, दुय्यम न्यायालयात मराठीत निर्णय, ग्रंथालय अनुदानात वाढ, गृहनिर्माण धोरण, राज्यभारनियमनमुक्त केले, झोपडपटटी पुर्नवसन, शेतकरी व विदयार्थ्याना विमा योजना एक ना अनेक ऐतिहासीक निर्णय घेतले यामुळे महाराष्ट्र विकास, गुंतवणूक यामध्ये देशात क्रमांक एकचे राज्य झाले होते.
विलासरावजी देशमुख या अलौकीक नेतृत्वाची आज जयंती आहे, त्यांना शतशा नमन.

राहूल हरिभाऊ इंगळे पाटील
रा.करकट्टा ता.जि.लातूर
मो. ९८९०५७७१२८