अभिनंदन आप्पा …!
लोकप्रतिनिधी सर्वाधिक लोकप्रिय होत असतो तो लोकांच्या हाकेला धावून जात त्यांची कामे करतो. भारतीय जनता पक्षाचे आमदार यानी माझ्या एका पोस्ट ची दखल घेऊन लातूर मधील पत्रकारांना कोरोनाची मोफत लस देण्याची घोषणा केली आहे याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन .
मी इचलकरंजी मध्ये आठ वर्षे पत्रकारिता केली यावेळी तेथील लोकप्रतिनिधीना जवळून पाहता आले. यात सहकार महर्षी कै. रत्नाप्पा अण्णा कुंभार, कै. शामराव पाटील यड्रावकर , माजी खासदार बाळासाहेब माने , माजी आमदार कै. कल्लाप्पा मलाबादे , माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील याच्यासह आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह किती तरी लोकप्रतिनिधीची नावे सांगता येतील…
तीन चार दिवसापूर्वी इचलकरंजीतील माझे जीवलग मित्र पत्रकार चिदानंद आलुरे यांनी ‘ माध्यम … ‘ या समूहात एक पोस्ट शेअर केली होती ती अशी होती की , आमदार प्रकाश आवाडे यांनी स्वखर्चाने पत्रकारांना कोरोनाची लस दिली… या पोस्टची स्रीनशाँट घेऊन मी ते पालक मंत्री अमित देशमुख यांच्यासह आमदार रमेश अप्पा कराड आणि इतर लोकप्रतिनिधी च्या व्हाँस्अपवर टाकली व असा निर्णय आपण घ्यावा असे आवाहन मी केले होते. त्याची त्वरीत दखल घेत आमदार रमेश अप्पा कराड यांनी येत्या सोमवार पासून पत्रकार व त्यांच्या पत्नीस कोरोना लस मोफत देण्यात येईल अशी घोषणा केली आहे म्हणून ते अभिनंदनास पात्र आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढला आहे त्यामुळे प्रतिबंधात्मक लस घेतली जात आहे. वृत्तसंकलनसाठी दिवस-रात्र कोणत्याही परिस्थितीत समाजमाध्यमातील प्रतिन काम करीत असतात. कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना कोरोनाविषाणू प्रादुर्भाव होऊ नये यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश आप्पा कराड यांच्या वतीने मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस सोमवार दिनांक 15 मार्च 2019 पासून लातूर येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात देण्यात येणार आहे. कोरोना हा महाभयंकर आजार जगात आणि देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढत असताना त्याच बरोबर लाँकडाऊनच्या काळात ही जनहिताच्या बातम्यांसाठी सातत्याने दिवस-रात्र कधीही कुठेही फिरुन वृत्त संकलन करण्याचे काम पत्रकारांनी केले असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड यांनी लक्षात घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाची काळजी करत काम करणाऱ्या या पत्रकारांना कोरोना लस देण्यात येईल असे जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यातील पत्रकारांना मोफत कोरोना लस देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रमेशअप्पा कराड यांनी घेतल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .मी आठ वर्षे पश्चिम महाराष्ट्रात पत्रकारिता केली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना ज्याप्रमाणे सांभाळतात , त्यांच्या अडीअडचणीकडे लक्ष देतात त्याप्रमाणे इतर ठिकाणचे लोकप्रतिनिधी देत नाहीत हा माझा अनुभव आहे . आमदार प्रकाश आवाडे व आमदार रमेश अप्पा कराड यांचे मनापासून अभिनंदन.