लातूर दि.10-07-2022
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढविसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन 11 जुलै 2022 आज रोजी करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावेत असे आवाहन माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आलेले आहे.
11 जुलै 2022 रोजी वाढदिवसानिमित्त माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या शुभहस्ते सकाळी 7 वाजता मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरात महाअभिषेक करण्यात येणार आहे. तसेच सुरतशहावली दर्गा येथे चादर चढविणे, कव्हा येथील शेखमियाँ दर्गा येथे चादर चढविणे, सिध्देश्वर मंदिरात महाअभिषेक, एम.एन.एस.बँकेतर्फे सकाळी 10 वा. मातोश्री वृध्दाश्रृमात व औसा तालुक्यातील हासेगाव येथे सेवालयामध्ये अन्नसेवा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. याबरोबरच माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांच्या मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी व वैयक्तिक शुभेच्छा स्वीकारल्या जाणार आहेत.

त्यामुळे भाजपा पदधिकारी व कार्यकर्त्यांनी या विविध कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी व्हावे, असे आवाहन लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब संयोजन समितीचे अध्यक्ष एस.आर.मोरे, जननायक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब कोरे, कार्याध्यक्ष जाफर पटेल, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार आदींनी केले आहे.
14 जुलै रोजी रामायणाचार्य ढोक महाराजांचे किर्तन
लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता रामकृष्ण मंगल कार्यालय, कन्हेरी रोड, मोती नगर, लातूर येथे रामायणाचार्य ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांचे किर्तन आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या किर्तनाचा लातूर शहर व परिसरातील भावी-भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
————————————————–