सर्वकष विकासाचा लोककल्याणकारी अर्थसंकल्प
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर
लातूर/प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील तिसºया केंद्र सरकारमध्ये कार्यरत असलेल्या अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी मांडलेला अर्थसंकल्प देशवासियांची मने जिंकणारा आहे. देशातील प्रत्येक समाज घटकांचा विचार करत त्यांच्या आशा आंकांक्षाची पुर्तता करण्याचा संकल्प यानिमित्ताने मांडण्यात आल्याच्या प्रतिक्रिया माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्य विकास, सामाजिक ज्ञान व महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देत विकसित भारताची पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प देशाला विश्वशक्ती बनविण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधत रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी महत्वाची तरतूद या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा चौथा टप्पा सुरू करण्याचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. त्याच बरोबर एक कोटी शेतकºयांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णयही महाष्ट्रातील शेतकºयांसाठी महत्वाचा आहे. कररचनेत बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देत रुग्णांनाही अधिक सुविधा देण्यसाठी करण्यात आलेली तरतूद ही निश्चितच प्रत्येक भारतीयांसाठी महत्वाची ठरणार आहे. त्यामुळेच हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वकष विकासाचा लोककल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले आहे.