लाला (लातूर लेडीज) ग्रुपच्या महीला मदत केंद्र
माध्यमातून महीलांनी तयार केलेल्या वस्तूंचे तीन दिवसीय प्रदर्शनाचे
डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व सौ. अदिती अमित देशमुख
यांच्या हस्ते उदघाटन
लातूर प्रतिनिधी : (गुरूवार दि. २९ मे २०२२)
लाला (लातूर लेडीज) ग्रुपच्या महीला मदत केंद्र माध्यमातून महिलांच्या लघू उदयोग व मोठे उद्योगात महीलांनी तयार करण्यात आलेल्या वस्तुचे दि. २९ जूलै ते ३१ जूलै दरम्यान तीन दिवसीय प्रदर्शन लातूर येथील श्याम मंगल कार्यालय येथे भरवले असून या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडले आहे.
लातूर शहरातील महीलाच्या पूढाकारातून लाला (लातूर लेडीज) ग्रुपच्या महीला मदत केंद्र माध्यमातून महिलांनी लघू उदयोग व मोठे उद्योगाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूचे प्रर्दशन लातूर येथील श्याम मंगल कार्यालय येथे दि. २९ जूलै ते ३१ जूलै दरम्यान भरवले आहे. या तीन दिवशीय प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. सण उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू, डिझायनर ब्लाऊज, साडी, कुर्ती, तसेच ज्वेलरी अशा अनेक वस्तूच्या वेगवेगळ्या स्टॉलने मंगल कार्यालय गजबजून गेले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर व ट्वेन्टीवन ॲग्री लि., च्या संचालीका व गोल्ड क्रेस्ट स्कुल ऑफ ग्रुपच्या प्रमुख सौ. अदिती अमित देशमुख यांनी महिलांची गरज ओळखून त्यांच्यासाठी हे मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल लाला ग्रुपच्या संचालिका सौ. रेश्मा अग्रवाल व संपूर्ण टीमचे मनस्वी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमास डॉ. सुरेखा काळे, सौ. मीना गायकवाड, सौ. संगीता मोळवणे, सौ. सपना किसवे, सौ. रागिनी सतीश यादव, सौ. स्वाती घोरपडे, सौ. श्वेता लोंढे, सौ. शोभाताई पाटील, सौ. भाग्यश्री कोळखैरे, सौ. जान्हवी सूर्यवंशी, सौ. वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनीषा वैद्य यांनी केले.
———-