लातूरसंस्कृती
लातूर जिल्ह्यात गावागावात, शेताशेतात भोकरी वरण किंवा बोरसूरी वरण याच्या झिंगाट पार्ट्या होतात… शे दोनशे लोकं आरामात जेवायला येतात… हा प्रकार नेमका काय आहे यावर ” लातूर संस्कृती ” या पेजवर आलेला लेख साभार…!!
बोरसुरी वरण किंवा भोकरी वरण
आमच्या मराठवाड्यातील आण खास मंजी निलंगा (लातूर) आण पंचकृषित वरणाचा ह्यो फर्मास जिन्नस. ह्ये वराण यकदम झणझणीत आण बेस (बेस्ट) असतया.
चला तर मंडळी म्या सांगतू तुमि करून बागा
वरण कराया लागणारं जिन्नस:-
पाऊण वाटी तूरडाळ
अर्धी वाटी मुगडाळ
अर्धी वाटी मसुर डाळ
१/२ वाटी खोब्र्याचं तुकडं
७-८ लसणीच्या पाकळ्या
२ छोटे आल्याचे कांड
१ मोठा कांदा
१.१/२ चमचं जिरं
१ चमचा कांदा लसणाचा मसाला
२ बोळी तेल
कढीपत्ता
१/२ चमचा हळद
आण
कोथिंम्हिर
कराया चालू करू बरका मंडळी
¶ समद्यात आदी डाळी धून घ्या आण त्या शिजवून घ्या. शिजिवताना त्यात हळद घाला.
¶ आता समदे मसाले काढून घ्या…… थोड्या तेलात परतून घ्या आण खलबत्यात कुटून घ्या.
¶ दुसऱ्या भांड्यात तेल घालून ते गरम झालं की त्यात हिंग , कढीपत्ता आण जिरं घालून फोडणी द्या.
¶ तेच्यामंदी कुटून घेतलेलं वाटन टाका आण नंतर त्यात कांदा लसणीचा मसाला घालून परता.
¶ आता त्यात समद्या शिजलेल्या आण घोटलेल्या डाळी घाला.
¶ बेस पैकी परतून घ्या.
¶ आता तुम्हासनी फैजेल तेवढं पाणी टाकून उकळी येऊ द्या.
¶ पाच धा मिनट झालं की त्या वरणांत कोथिम्हिर टाका.
¶ ही वरण झणझणीत असतय म्हणूनशिण्या त्यात मोकळ्या हातानं लाल भुकटी (लाल मिरची पावडर) टाका.
¶ आण मस्त फरमास पैकी भाकरी सोबत निब्बर काला वरपून खावा.
¶ असा बेत म्हणजी आक्षी गंमतच 😍
मंडळी लागलीच रातच्याला करून बघा आण आमाला बी सांगा बरका कसं लागलं ते.
आपलाच म्हैपती 🙂
( लातूर जिल्ह्याची म्हणून वेगळी संस्कृती आहे… त्यात खानपान पासून ते बोली पर्यंत… जत्रा यात्रा पासून ते परंपरा पर्यंत.. काय आहे लातूर संस्कृती जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पण हिस्सा व्हा.. पेज लाईक करा आणि रोज नवं मनाला भावणारं वाचा
https://www.facebook.com/latursanskruti/ )