लातूर/प्रतिनिधी ः-
लातूर शहर जिल्हा काँगे्रस मिडिया सेलच्या अध्यक्षपदी व्यंकटेश पुरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती केल्याबद्दल पालकमंत्री अमित देशमुख व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन व्यंकटेश पुरी यांनी आभार व्यक्त केले आहेत. पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे तो विश्वास सार्थ ठरवत पक्षाला अधिकाधिक लोकापर्यंत पोहचविण्यासाठी आपण आपले योगदान देऊ अशी ग्वाही व्यंकटेश पुरी यांनी दिलेली आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यातील प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधीसोबत सलोख्याचे संबंध असलेले व्यंकटेश पुरी यांची लातूर शहर जिल्हा काँग्रेस मिडिया सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापुर्वी व्यंकटेश पुरी यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जी-जी जबाबदारी दिली ती-ती जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडत पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविलेला आहे. व्यंकटेश पुरी यांची मिडिया सेलच्या अध्यक्षपदी झालेली निवड काँगे्रस पक्षाकरीता निश्चितच लाभदायक ठरणार आहे. व्यंकटेश पुरी हे प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधिसोबत सातत्याने संपर्कात असतात व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावाही करीत असतात. ही बाब लक्षात घेऊनच व्यंकटेश पुरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
सदर नियुक्ती करण्यात आल्याबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह माजी मंत्री दिलीपराव देशमुख याची भेट घेऊन व्यंकटेश पुरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास दाखवत आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही व्यंकटेश पुरी यांनी दिलेली आहे. सदर भेटीप्रसंंगी व्यंकटेश पुरी यांच्यासोबत नगरसेवक सचिन बंडापल्ले, पप्पु देशमुख, युनुस मोमीन आणि नागसेन कामेगावकर यांची उपस्थिती होती.