32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्र*लातूर विमानतळ विस्तारीकरणाचे काम त्वरीत पूर्ण करा -आ.देशमुख*

*लातूर विमानतळ विस्तारीकरणाचे काम त्वरीत पूर्ण करा -आ.देशमुख*

*लातूर विमानतळ विस्तारीकरणाचे काम त्वरीत पूर्ण करून

*येथून उडडान योजना अंतर्गत विमानसेवा सुरू करावी*

*माजी मंत्री, आमदार अमित देशमुख

लातूर प्रतिनिधी २१ जूलै २३:

  मराठवाडयातील लातूर, ऊस्मानाबाद, बीड जिल्हयाच्या विकासाला गती देण्यासाठी लातूर विमानतळ विस्ताराची उर्वरीत कामे त्वरीत पूर्ण करुन येथून उडडान योजना अंतर्गत विमानसेवा सुरू होण्याच्यादृटीने महाराष्ट्र शासनाने पाठपूरावा करावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी आज विधानसभेत पावसाळी अधिवेशन प्रसंगी बोलतांना केली.

महाराष्ट्रातील विमानसेवेचे विस्तारीकरण करण्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी होतांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर विमानळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या ९.८८ हेंक्टर जमीनीचे संपादन करून संरक्षण भिंतीचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी केली. 

याप्रसंगी बोलतांना आमदार देशमुख म्हणाले की, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी रोजगार हमी योजनेतून लातूर येथे विमानतळ उभारणीचे काम केले आहे. अशा प्रकारे विमानतळ उभारणी हे राज्यातील नाही तर देशातील पहीले उदाहरण आहे. या विमानतळावरून विमानसेवा सुरूही झाली होती मात्र नंतर विमानसेवा प्राधिकरणाच्या नियमात बदल झालेमुळे सदरील सेवा बंद करण्यात आली आहे. नवीन नियमाची पुर्तता करण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या ४८.८० हेंक्टर जमीनीपैकी ३८.९२ हेंक्टर क्षेत्राचे संपादन पूर्ण झाले असून उर्वरीत ९.८८ हेंक्टर जमीनीचे संपादन करणे प्रलंबीत आहे. त्यामुळे संरक्षण भिंतीचे थोडेफार काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण होताच विमानतळ विमानसेवेसाठी सज्ज होणार आहे. उपमुख्यमंत्री ना. देवेद्र फडणवीस यासाठी सकारात्मक आहेत. तर मंत्री ना. गुलाबराव पाटील व ना. उदय सामंत यांनी हे विमानतळ सुरू करण्याचेदृष्टीने चांगला प्रतिसाद दिला आहे. सदया उच्चस्तरीय समितीच्यास्थरावर हे प्रकरण आहे, असे सांगून ही प्रकीया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारीस्तरावर अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

लातूर येथील विमानतळावर फलाइगस्कुलची मंजुरी मिळाली असल्याचे सांगून हे विमानतळ मराठवाडयासाठी डीजास्टर मॅनेजमेंट तसेच मेडीकल इर्मजन्सीच्यादृष्टीने महत्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मांजरा नदीला पूर आला होता तेव्हा या विमानतळावर मदतीसाठीचे हेलीकॉप्टर उतरवण्यात आले असे सांगून भाजप नेते तथा माजी मंत्री आदरणीय गोपीनाथ मुंढे यांना मेडीकल इर्मनन्सीची गरज पडली तेव्हा त्यांना या विमानतळावरून एअर ॲम्बूलन्सने लातूर येथून मुंबई येथे उपचारासाठी आणले होते अशी आठवण सांगितली होती.

लातूर हा कृषीप्रधान भाग असून या भागात विविध प्रकारचा भाजीपाला, फळे, फुले उत्पादीत होतात हा शेतीमाल देशात व परदेशात पोहचवण्यासाठी येथे कार्गो विमानसेवा सुरू करणे शक्य आहे. त्यामुळे राज्यातील विमानसेवेचा विस्तार करीत असतांना लातूर विमानतळ लवकरात लवकर विमानसेवेसाठी सज्ज करावे, त्याच बरोबर या ठिकाणावरून केंद्र शासनाची उडडान विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]