25 C
Pune
Monday, May 5, 2025
Homeराजकीय*लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे विजयी*

*लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे विजयी*

लातूर लोकसभा मतदारसंघातून मविआ काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे विजयी, कार्यकर्त्यांकडून जल्लोष.

लातूर (प्रतिनिधी)-दि.०४ मे २०२४ देशाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवार दि.०४ मे रोजी जाहीर झाले.या निवडणुकीत लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.शिवाजी बंडप्पा काळगे विजयी झाले या विजयाबद्दल काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यानी विजयी जल्लोष साजरा करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या देखरेखीखाली लोकसभा निवडणूक पार पडली.या निवडणुकीत डॉ शिवाजी काळगे यांचा प्रचंड मताधिकक्याने विजय झाल्याचे समजताच लातुर शहर तसेच जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विजयी जल्लोश साजरा केला.

लातुर शहरातील काँग्रेस भवन तसेच मतमोजणी केंद्र असलेल्या शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालया समोर पक्ष कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. 

या प्रसंगी लातुर ग्रामीण मतदारसंघातील आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्यासह लातुर शहर तसेच जिल्हा काँग्रेस च्या विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य,कार्यकर्ते दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]