लातूर ; दि. ६ ( प्रतिनिधी) –केंद्र सरकारच्या वतीने ‘अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजने’अंतर्गत लातूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा देशाचे पंतप्रधान ना.श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला. यावेळी लातूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो, याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आमदार संभाराव पाटील निलंगेकर यांनी आनंद व्यक्त करुन पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.
यावेळी रेल्वे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. माझ्या व मान्यवर खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.
पंतप्रधान ना.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीतून व कणखर सक्षम नेतृत्वाखाली भारत नवीन दिशेने आणि अधिक वेगाने घोडदौड करत आहे. वाहतुक व दळणवळणाच्या सेवा अधिक मजबूत करण्यासाठी रेल्वेचे जाळे अधिक विस्तारण्यात येत आहे. यानिमित्ताने देशातील रेल्वे स्थानके अधिक देखणी होऊन नागरिक व प्रवाशांसाठी आकर्षणाची केंद्र ठरवीत याकरिता ‘अमृत भारत स्थानक योजने’ अंतर्गत स्टेशनचे सुशोभीकरण व प्रवाशांसाठी सुविधा उभारण्यात येत आहेत. यामाध्यमातून लवकरच लातूर रेल्वेस्थानक एका नव्या आणि देखण्या स्वरूपात नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा घेऊन सेवेत दाखल होईल. आदरणीय पंतप्रधानांनी या अगोदरच लातूरला मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याची भेट देऊन जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केलेला आहे. आता या नवीन अत्याधुनिक रेल्वे स्थानाकामुळे रेल्वे विकासामध्ये आपला लातूर जिल्हा आणखी एक नवा ‘पॅटर्न’ तयार करेल, असा विश्वासही आमदार निलंगेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
तसेच रेल्वे विभागाच्या वतिने आयोजित निबंध स्पर्धेत विद्यार्थींनी व महिलांनी आपले आगळं वेगळंपण दाखवले आहे. रेल्वे विभागाने या संकल्पनेचा गांभीर्याने विचार करुन त्या अनुषंगाने नुतनीकरण करताना लक्ष द्यावे. तसेच राज्य सरकारने महिला प्रवाशांना एसटी प्रवासात ५०% सुट्ट दिल्याप्रमाणे रेल्वे प्रवासात ही सुट्ट देण्यासाठी खा. सुधाकरजी श्रृंगारे यांनी अधिवेशनात पाठपुरवठा करावा, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी आ. रमेशप्पाजी कराड, पद्मश्री डॉ. तात्यारावजी लहाने, जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे ठाकूर, पोलीस अधीक्षक सौमयजी मुंडे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख , भाजपा शहराध्यक्ष देविदासजी काळे, माजी आमदार गोविंदण्णा केंद्रे, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य जयश्रीताई पाटील, संघटन सरचिटणीस संजयजी दोरवे, चेअरमन दगडुजी सोळुंके, प्रदेश प्रवक्त्या प्रेरणाताई होणराव, दिग्विजयजी काथवटे, रेल्वे विभागाचे विवेक हुकेजी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.