लातूर- मुंबई सुपरफास्ट व बिदर -छत्रपती शिवाजी महाराज सुपर फास्ट एक्सप्रेस या रेल्वेगाडयांकरीता डब्यांची वाढ
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पाठपुराव्यास यश
धाराशिव;/प्रतिनिधी धाराशिव, लातूर, उदगीर परीसरातील नागरीकांची मागील अनेक वर्षापासूनची प्रलंबीत मागणी अखेर रेल्वे मंत्रालयाकडून मान्य करण्यात आली आहे. धाराशिव येथील रेल्वे प्रवाश्यांना तिकीट काढून देखील साधारणत: 10 ते 15 दिवस प्रतीक्षा यादीमध्ये थांबावे लागत होते. यामुळे प्रवाश्यांची गैरसोय दुर होणार असून यापुढे नागरीकांना प्रतीक्षा यादीमध्ये थांबावे लागणार नाही.
लातूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस सुपर फास्ट (गाडी नं. 22107 व 22108) व बिदर-छत्रपती शिवाजी महाराज सुपर फास्ट एक्सप्रेस (गाडी नं. 22143 व 22144) या गाडयांना 2A व 3A करीता वाढीव डब्यांची मागणी पुणे येथे दि. 28/08/2019 दि. 08/10/2020 दि. 13/07/2021 दि. 15/10/2023 रोजीच्या सोलापूर रेल्वे विभागाच्या झालेल्या बैठकी दरम्यान खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली होती. या बैठकीस प्रामुख्याने श्री. ए. के. गुप्ता (महाप्रबंधक) मध्य रेल्वे यांच्याकडे केली होती व सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केंद्रीय रेल्वे मंत्री मा.ना.श्री. अश्विनी वैष्णव यांच्याकडे केला होता. वरील दोन्ही रेल्वे गाडयांना अतिरीक्त डब्बे जोडले जाणार असल्याचे पत्र रेल्वे विभागाकडून प्रकाशित करण्यात आले आहे.
बिदर-छत्रपती शिवाजी महाराज सुपर फास्ट एक्सप्रेस (गाडी नं. 22143 व 22144) व लातूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस सुपर फास्ट (गाडी नं. 22107 व 22108) या गाडयांना प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेच्या वाढीव 2A व 3A डब्यांची मागणी लावून धरत लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान विविध आयुधाच्या माध्यमातून आवाज उठविला होता. याचाच परीणाम म्हणून रेल्वे विभागाकडून दि.21/11/2024 रोजीच्या पत्राव्दारे अतिरीक्त डब्बे दि. 01/12/2024 पासून जोडत असल्याचे जाहीर केले आहे.
धाराशिव व लातूर जिल्हयातील रेल्वे प्रवाश्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नागरीकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.