खात्रीने सांगतो, एवढं युनिक प्रात्याक्षिक शिक्षणाची प्रयोग शाळा देशात कुठेही नसेल… ही शाळा नाही… याला कोणता सिलॅबस नाही… इथं होमवर्क नाही… इथं परीक्षा नाही. इथं यायचं प्रयोग शिकायचे, प्रयोग करायचे… सिंगल मिनिटही इथलं शिक्षण बोर होत नाही… सुरुवात होते मोठ्या दुर्बीण पासून… यातून सगळ्या गृहाचे दर्शन होते… खगोलशास्त्र कळते, मोठा पृथ्वीचा मोठा गोळा समोर दिसतो… त्याला उघडलं की… मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाच स्तर दिसतात त्याला नंबर टाकून ठेवलेले.. त्या नंबर वर जाऊन स्कॅन केलं की त्या स्तराची माहिती मिळते त्यातून अख्ख भुगर्भ शास्त्र समजतं… पुढे मानवी पुतळा दिसतो… त्याचा प्रत्येक सूक्ष्म भाग खोलून बघता येतो… त्यातून जीवशास्त्र कळते… पुढे एक विमान दिसलं, म्हटलं हे काय तर हे इरॉनेटिक सायंस…त्या सोबत पॉकेट मध्ये सुट्टे पार्ट… म्हणाले विमान कसं बनवायचं याचं प्रात्यक्षिक इथं देतो… असे एक नव्हे अनेक प्रयोग इथं अनुभवायला मिळतात… संस्थेच नाव आहे “steem ” सायन्स, टेकनॉलॉजि इमर्जिंग मीडिया…
आठवड्यातून पाच तास आम्हाला द्या तुमचं पाल्य पुस्तक हातात न घेता.. अख्ख विज्ञान, तंत्रज्ञान आमच्याकडे शिकेल… मला तर वाटतं येत्या काही वर्षात यातून अनेक वैज्ञानिक तयार होतील… प्रत्येक पालकांनी या शिक्षणाच्या प्रयोग शाळेला भेट द्यावे… हे बघितल्या पासून तर विज्ञान आणि गणितात “ढ ” असलेला मी अरे हे विषय कमालीचे सोपे आहेत… असं वाटायला लागलं आहे… ही संस्था चालवणाऱ्या “रांचोचं” नाव आहे… झुरुळे ओमप्रकाश… इथं या बघा… आपले लक्क डोळे उघडतील आणि पुन्हा शिकावं वाटेल… मी तर त्यांना सांगितलंय मला फीस घेऊन हे सगळं विद्यार्थी म्हणून शिकायला आवडेल… मी पुन्हा जाईन.. पुन्हा जाईन.. प्रेमात पडलोय या प्रयोगाच्या… हॅट्स ऑफ रांचो आय मिन झुरुळे सर… 🌹😊🙏🏻
युवराज पाटील
( जिल्हा माहिती अधिकारी ,लातूर )